आर्वीत दोनशेवर शिक्षकांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:00 IST2020-08-25T05:00:00+5:302020-08-25T05:00:06+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपासून शिक्षक विविध प्रकारची अनेक कामे आणि आर्वी नगरपालिका क्षेत्रात कोविड-१९ अंतर्गत आयएलआय सर्वेक्षण अनेक अडचणींना तोंड देत प्रामाणिकपणे करीत होते. त्यामुळे शाळेचे ऑनलाईन वर्गसुद्धा ठप्प झाले आहेत.

आर्वीत दोनशेवर शिक्षकांचा एल्गार
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : कोविड-१९ इन्फ्लुएन्झा लाइक इलनेस (आयएलआय) सर्वेक्षण कामातून सर्व शिक्षकांना शासनाच्या पत्रान्वये तत्काळ कार्यमुक्त करावे या आशयाचे निवेदन येथील उपविभागीय अधिकारी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना सर्व शिक्षकांनी सोमवारी दिले. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांनी काढलेल्या पत्राचाही सर्व शिक्षकांनी निषेध केला.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपासून शिक्षक विविध प्रकारची अनेक कामे आणि आर्वी नगरपालिका क्षेत्रात कोविड-१९ अंतर्गत आयएलआय सर्वेक्षण अनेक अडचणींना तोंड देत प्रामाणिकपणे करीत होते. त्यामुळे शाळेचे ऑनलाईन वर्गसुद्धा ठप्प झाले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार कोविड-१९ अंतर्गत आयएलआय सर्वेक्षणातून शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करा, असे निवेदनात नमूद आहे.
दुसऱ्या निवेदनात चार महिन्यांपासून कोविड-१९ संकट काळात राष्ट्रीय कार्य प्रामाणिकपणे पार पडत असूनही निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी २१ ऑगस्ट २०२० च्या पत्रान्वये शिक्षकांनी केलेले कार्य मातीमोल झाले असल्याची संतप्त भावना शिक्षकांनी व्यक्त केली. याचा सर्व शिक्षकांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला. हा आदेश त्वरित रद्द करावा, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेश्र
निवासी उपजिल्हाधिकारी जोपर्यंत आदेश मागे घेत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन करीत असल्याचेही शिक्षकांनी म्हटले आहे. यामुळे आर्वी शहरात एकच खळबळ उडाली आहे.