शिवसेनेच्या प्रयत्नाने मिळणार शेतकऱ्यांना बोंडअळीची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 22:20 IST2019-06-22T22:20:14+5:302019-06-22T22:20:46+5:30
शेतकऱ्यांची शासनाकडे थकीत असलेली बोंडअळीची रक्कम आणि पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील अनुदान वाटप सुरू झाले असून ज्या शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाही, त्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याच्या माहितीसह आधारकार्डच्या झेरॉक्स प्रती जोडून गावातील तलाठी किंवा तहसीलदार, सेलू कार्यालयात अर्ज करावा,...

शिवसेनेच्या प्रयत्नाने मिळणार शेतकऱ्यांना बोंडअळीची रक्कम
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : शेतकऱ्यांची शासनाकडे थकीत असलेली बोंडअळीची रक्कम आणि पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील अनुदान वाटप सुरू झाले असून ज्या शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाही, त्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याच्या माहितीसह आधारकार्डच्या झेरॉक्स प्रती जोडून गावातील तलाठी किंवा तहसीलदार, सेलू कार्यालयात अर्ज करावा, अशी माहिती तहसीलदार सोनवणे यांनी शिवसेना वर्धा जिल्हाप्रमुख राजेश सराफ यांना दिली.
सेलू तालुक्यातील शेकडो शेतकºयांची रक्कम शासनाकडे थकीत होती. याबाबत अनेक शेतकºयांनी शिवसेनेकडे तक्रार केली होती. अखेर शनिवारी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश सराफ यांनी पदाधिकारी व शिवसैनिकांना सोबत घेत तहसीलदार सोनवणे यांना निवेदन सादर करून जाब विचारला.
यावेळी झालेल्या चर्चेत शासनाकडून रक्कम जमा झाली असून, काही शेतकºयांच्या खात्यात रक्कम वळती करण्यात येत आहे. ज्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही, त्यांनी रीतसर अर्ज सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख राजेश सराफ, उपजिल्हाप्रमुख किशोर बोकडे, सेलू तालुकाप्रमुख रवींद्र चौहान, सेलू तालुका अधिकारी संदीप कांबळे, कृष्णा वाकडे, सचिन धोटे, सचिन कोपरकर, रवी गांजरे, नीलेश लोणकर, अरुण लोणकर, लक्ष्मण मसराम, सुरेश भोयर, विजय वाकडे, वर्धा तालुका अधिकारी राहुल पाटणकर, उपतालुकाप्रमुख नवनीत साखरकर, पवनार शाखाप्रमुख संदीप हिवरे, किरण गोमासे, वीरेंद्र भट आदींचा समावेश होता.