शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

पंक्चर दुरुस्ती करणाऱ्याचे ‘टाकाऊ’ वस्तूंमधून ‘टिकाऊ’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 6:00 AM

दाबीर शेख हे वीस वर्षापूर्वी मोठ्या भावासोबत कारंजा शहरात आला. कुटुंबासोबत राहत असताना त्याने आपला वडिलोपार्जीत पंक्चर दुरुस्तीचा व्यवसाय सुरु केला. या दरम्यान कारंजा नगरपंचायतच्यावतीने सुरु केलेल्या स्वच्छता मोहिम व वृक्षारोपण अभियानाचे त्याने बारकाईने अवलोकन केले. आपल्या या पारंपरिक व्यवसायातून वाया जाणाऱ्या टायर-ट्युबपासून या शासकीय उपक्रमाला हातभार लावता येईल का?

ठळक मुद्देस्वच्छतेसह वृक्षारोपणास प्रोत्साहन : टायरपासून बनवितोय वृक्ष व कचराकुंड्या, नजर पडताच नागरिक पडतात मोहात

अरूण फाळके।लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : एखाद्या सामान्य माणसाने, सामाजिक जाण ठेवून मनावर घेतले तर तो शासकीय उपक्रम उत्तम प्रकारे राबवू शकतो, आणि पाहता पाहता तो समाजाचा कौतुकाचा आणि आदर्शाचा विषय ठरू शकतो. याचा प्रत्यय कारंजा बसस्थानक परिसरात टायर पंक्चर दुरुस्तीचे काम करणाºया मोहम्मद दाबीर शेख यांच्या बाबतीत आला. आपल्या कल्पकतेने टाकाऊ टायरपासून विविध आकाराच्या वृक्ष कुंड्या व कचरा कुंड्या बनवून ते स्वच्छता आणि वृक्षारोपण अभियानाला प्रोत्साहन देत आहे.दाबीर शेख हे वीस वर्षापूर्वी मोठ्या भावासोबत कारंजा शहरात आला. कुटुंबासोबत राहत असताना त्याने आपला वडिलोपार्जीत पंक्चर दुरुस्तीचा व्यवसाय सुरु केला. या दरम्यान कारंजा नगरपंचायतच्यावतीने सुरु केलेल्या स्वच्छता मोहिम व वृक्षारोपण अभियानाचे त्याने बारकाईने अवलोकन केले. आपल्या या पारंपरिक व्यवसायातून वाया जाणाऱ्या टायर-ट्युबपासून या शासकीय उपक्रमाला हातभार लावता येईल का? याचा विचार करु लागले. त्यातून त्यांना टाकाऊ टायरट्युबच्या तुकड्यांपासून कचरा कुंड्या व झाडे लावण्यासाठी वृक्ष कुंड्या तयार करण्याची संकल्पना सुचली. आजच्या घडीला त्यांनी वाया गेलेल्या टायरट्युबपासून बदक, बगळा, मोर, हत्ती, कासव, उंट, कावळा, चिमनी, कमळ यासह सायकलच्या आकाराच्या आकर्षक कचराकुंड्या व वृक्षकुंड्या बनविल्या आहेत. यासर्व कुंड्यांना विविध रंग देवून त्यात झाडे लावली आहे. जवळपास दीडशेच्यावर असलेल्या या कुंड्यांची दुकानाच्या बाजुलाच सुंदर अशी मांडणी करण्यात आली आहे. या कुंड्या अनेकांच्या नजरेत भरत असून त्या विकत घेण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. त्यामुळे रस्त्याने येणारे-जाणारे या कुंड्याही खरेदी करीत आहे. त्यामुळे दाबीर शेख यांच्या संकल्पनेने अभियानालाला प्रोत्साहन मिळण्यासोबत त्यांना वेगळा रोजगार मिळाला आहे. तसेच त्यांचा छंदही जोपासल्या जात असल्याने त्यांना वेगळे समाधान लाभत आहे.पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला सत्कारमहम्मद दाबीर शेख यांच्या या अनोख्या उपक्रमाची आणि अभियानातील सहकार्याची कारंजा नगरपंचायतने दखल घेतली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सद्या कारंजा शहरात मोहम्मद दाबीर शेख यांच्या या आकर्षक कलाकृतीची आणि विधायक मनोवृत्तीची सर्वत्र चर्चा आहे.परगावातही कुंड्यांची मागणी वाढलीएक सामाजिक भान ठेवून दाबीर शेख यांनी विठ्ठल टेकडी परिसरात ११ झाडांच्या कुंड्या व २ कचऱ्या कुंड्या दान दिल्यात. दाबीर शेख यांच्या या आकर्षक कुंड्या आता अमरावती, अकोला, आर्वी, तळेगाव, आष्टीतही पोहोचल्या आहेत. अनेकांना भूरळ घालणारी ही कलाकृती सर्वपरिचित होत असल्याने कुंड्यांची मागणीही वाढत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक