नाफेडची विविध शेतमाल खरेदीची पद्धत सदोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 11:36 PM2018-09-30T23:36:39+5:302018-09-30T23:37:49+5:30

नाफेडच्यावतीने होत असलेली शेतमालाची खरेदी समजण्यापलीकडे आणि सदोष पद्धतीवर आधारीत आहे. तालुकास्तरावरील केंद्रावर एकदा मालाची गुणवत्ता तपासल्यानंतर पुन्हा विभागीयस्तरावर शेतमालाची तपासणी केली जाते.

Due to the purchase of various commodities of Nafed | नाफेडची विविध शेतमाल खरेदीची पद्धत सदोष

नाफेडची विविध शेतमाल खरेदीची पद्धत सदोष

Next
ठळक मुद्देरणजीत कांबळे : देवळी कृषी उत्पन्न बाजार समिती येथील शेतकरी मेळावा व विकास कामांचा श्रीगणेशा

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : नाफेडच्यावतीने होत असलेली शेतमालाची खरेदी समजण्यापलीकडे आणि सदोष पद्धतीवर आधारीत आहे. तालुकास्तरावरील केंद्रावर एकदा मालाची गुणवत्ता तपासल्यानंतर पुन्हा विभागीयस्तरावर शेतमालाची तपासणी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना चुकारे मिळण्यास विलंब होत आहे. या पद्धतीत सुधारणा करून न्यायाची भूमिका घेणे गरजेचे असल्याचे मत आ. रणजित कांबळे यांनी व्यक्त केले.
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित शेतकरी मेळावा व विकास कामांचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुरेश देशमुख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते देवळी बाजार समितीच्या आवारात ६६ लाखांच्या निधीतून तयार करण्यात येत असलेल्या कार्यालय इमारतीच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. तर ५० मे.टन भुईकाट्याचे लोकार्पण करण्यात आले.
आ. कांबळे पुढे म्हणाले, मागील तीन वर्षांपासून शेतकºयांच्या शेतमालाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने व व्यापाºयांकडून शेतकरी नाडवल्या जात असल्याचे दिसून येते. यावर वेळीच योग्य पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हिंगणघाट बाजार समितीनंतर देवळी बाजार समितीने कापसाचे खरेदीत उच्चांक गाठला आहे. येथील संचालक मंडळाने परिश्रमातून व्यवसायाला गती द्यावी. या बाजाराचा विदर्भात असलेला लौकीक कायम ठेवावा असे याप्रसंगी माजी आमदार देशमुख यांनी सांगितले. याप्रसंगी उपसभापती संजय कामनापुरे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान विनोद घीया व माणकचंद सुराणा यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक कृऊबाचे सभापती मनोहर खडसे यांनी केले. कार्र्यक्रमाचे संचालन श्रीधर लाभे यांनी केले तर आभार प्रवीण ढांगे यांनी मानले.
सदर कार्यक्रमाला बाजार समितीचे संचालक सैय्यद अयुब अली, अमोल कसनारे, विजयशंकर बीरे, राजाभाऊ खेडकर, संजय लांबट, प्रमोद वंजारी, देवानंद भगत, प्रदीप लुटे, मंगेश वानखेडे, सुशील तिवारी, नटवरलाल मोकाती, अशोक पराळे, इंदू ठाकरे, शुभांगी ढुमणे, मोहन हावरे, मोहन शिदोडकर, मोरेश्वर खोडके, सुनील बासू, पवन महाजन, रमेश सावरकर, अ. जब्बार तंवर, सुरेश वैद्य, शैलेश पाळेकर, संजय भोंगे, हनुवंत नाखले, अशोक इंगळे, गुलाब डफरे, अजय देशमुख, दिलीप तायवाडे यांच्यासह शेतकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Due to the purchase of various commodities of Nafed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.