चंद्रपूरला जाणारा दारूसाठा जप्त
By Admin | Updated: August 18, 2015 02:15 IST2015-08-18T02:15:08+5:302015-08-18T02:15:08+5:30
आरंभा टोलनाका येथे केलेल्या कारवाईत रविवारी रात्री ११ वाजता गाडीचा पाठलाग करून पोलिसांनी दारूसाठा जप्त

चंद्रपूरला जाणारा दारूसाठा जप्त
समुद्रपूर : आरंभा टोलनाका येथे केलेल्या कारवाईत रविवारी रात्री ११ वाजता गाडीचा पाठलाग करून पोलिसांनी दारूसाठा जप्त केला. या कारवाईत एकूण ७ लाख ८२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
एम.एच. ३१ सी.एम. ३२०१ कार कारमधून प्रशांत गाडे व आशिष नाशीरकर दोन्ही रा. चंद्रपूर हे दोघेही देशी दारूची वाहतूक करताना मिळून आले. त्यांच्यावर दारूबंदी काद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई ठाणेदार रणजितसिंग चौहान यांच्या मार्गदर्शनात सुमेध आगलावे, राहुल गिरडे, प्रवीण चौधरी, राजू जैयसिंगपुरे यांनी कार्यवाही केली. पुढील तपास सुमेध आगलावे करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)
दोन दारूविक्रेत्यांना अटक
४वर्धा शहरातील गौरक्षण वॉर्ड येथील दारूविक्रेता नागपूर येथून दारू आणत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी कार्यवाही केली. यात दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत दोघांना अटक केली. नितीन बोरे (२९), रा. गौरक्षण वॉर्ड, वर्धा व प्रदीप गिरीपूंजे (३०) रा. गोंडप्लॉट अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत.
४सदर कारवाई पोलीस निरीक्षक एम.डी. चाटे, पोलीस उपनिरीक्षक एस.बी. कडू, जमादार सलाम कुरेशी, मनोज नांदूरकर, किशोर आप्तूरकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.