मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालविणे भोवले; चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2023 16:52 IST2023-04-17T16:51:53+5:302023-04-17T16:52:50+5:30

Wardha News हळदीच्या कार्यक्रमात दारु पिऊन दुचाकीवर ट्रिपलसीट जाणे तीन युवकांना चांगलेच भोवले. त्यांची सुसाट दुचाकी थेट पुलावरुन तब्बल २५ फूट खाली कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. 

Driving while intoxicated; Death of the driver in Wardha | मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालविणे भोवले; चालकाचा मृत्यू

मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालविणे भोवले; चालकाचा मृत्यू

चैतन्य जोशी

वर्धा : हळदीच्या कार्यक्रमात दारु पिऊन दुचाकीवर ट्रिपलसीट जाणे तीन युवकांना चांगलेच भोवले. त्यांची सुसाट दुचाकी थेट पुलावरुन तब्बल २५ फूट खाली कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील दोघांना गंभीर दुखापत झाली. हा अपघात बोरीबारा गावानजीक झाला.

याप्रकरणी १६ रोजी पुलगाव पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली. अनिल पारिसे असे मृतकाचे नाव आहे. तर रामदास शंकर देवनारे, मारोती कासार सर्व रा. सोरटा ता. आर्वी अशी जखमींची नावे आहे. जखमींवर पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृतक अनिल पारिसे, रामदास देवनारे, मारोती कासार हे तिघे सोरटा येथून दुचाकीने बोरी येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून ते दुचाकीने सोरटा येथे जाण्यासाठी निघाले. तिघेही मद्यधुंद अवस्थेत होते. मृतक अनिल याने सुसाट दुचाकी चालविली असता त्याला रस्त्याचा अंदाज न आल्याने बोरी बारा गावाच्या मार्गात सुरु असलेल्या नवीन बांधकाम सुरु असलेल्या पुलावरुन दुचाकी थेट २० ते २५ फूट खाली कोसळली. या अपघातात चालक अनिल पारिसे याचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद पुलगाव पोलिसांनी घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Driving while intoxicated; Death of the driver in Wardha

टॅग्स :Accidentअपघात