शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

डॉ. कदम यांनी केलेल्या चुकीच्या उपचाराने सात वर्षीय मुलीला अंधत्व; ठोठावला होता २५ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 7:45 AM

Wardha News वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीतील गर्भपात प्रकरण पेटले असतानाच, डॉ. कुमारसिंग कदम यांच्या चुकीने एका चिमुकल्या मुलीला कायमचे अंधत्व आल्याचे प्रकरण समोर आले आहे.

ठळक मुद्देव्याजाची रक्कम पीडितेच्या आईला देण्याचा होता आदेश

पुरुषोत्तम नागपुरे

वर्धा : सात वर्षीय मुलगी आपल्या आजोबासोबत वसंतनगर येथे दिवाळीसाठी आली होती. तिला ताप आल्याने डॉ. कुमारसिंग कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, चुकीच्या पद्धतीने केलेल्या औषधोपचारामुळे मुलीच्या दोन्ही डोळ्यांंना पूर्ण अंधत्व येऊन ती आंधळी झाली. ही घटना २००८ मध्ये घडली होती. याप्रकरणी कन्झ्युमर प्रोटेक्शन १९८६ सेक्शन १७अंतर्गत राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग नागपूर येथे नुकसानभरपाईसाठी याचिकाही दाखल करण्यात आली होती. हे विशेष.

ऋतुजा खारकर ही सात वर्षीय मुलगी २००८ मध्ये दिवाळ सणानिमित्त आजोबा हरिभाऊ पाचारे यांच्या घरी आली होती. दरम्यान तिला ताप आला असता कुमारसिंग कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तेथे झालेल्या चुकीच्या औषधोपचारामुळे तिला कायमचे अंधत्व आले. याप्रकरणी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग नागपूर येथे नुकसानभरपाईसाठी ऋतुजा खारकरतर्फे याचिका दाखल करण्यात आली होती. नागपूर खंडपीठाने डॉक्टर कदम यांनी चुकीचा औषधोपचार केला असा निर्णय देत २५ लाख रुपयांचा दंड आणि १४ सप्टेंबर २००९ पासून ९ टक्के व्याजाची रक्कम तसेच पीडितेच्या आईला २० हजार रुपये नुकसानभरपाई पोटी देण्याचा आदेश दिला होता.

परंतु, डॉक्टर कदम यांनी दंडाची रक्कम न भरता त्यांनी राष्ट्रीय ग्राहक आयोग दिल्ली खंडपीठाकडे वर्ष २०१७-१८ मध्ये अपील केले आहे. याप्रकरणात मागील तीन वर्षांपासून सुनावणी सुरू आहे. ऑगस्ट २०२० मध्ये मुलीच्या वडिलांचा पहिल्या लाटेतच कोरोनामुळे मृत्यू झाल्याने पीडित मुलीच्या आईची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणांमध्ये दिल्ली येथे ये-जा करण्यासाठी खर्च करण्याचीही परिस्थिती नाही.

नातलगांकडून उसनवारीने पैसे घेऊन न्यायालयाचा खर्च भागविणे सुरू आहे. अधिकचे पैसे नसल्यामुळे तारखेवर स्वतः किंवा नातेवाइकाला पाठवू शकत नाही. आईच्या मदतीशिवाय अंधत्व आलेली ऋतुजा ही काहीच करू शकत नसल्याने तिचे उर्वरित आयुष्य कसे जाईल, यासाठी तिच्याकडे कोणताही मार्ग नसून जीवन जागावे कसे, हा प्रश्न तिच्यापुढे उभा आहे. राष्ट्रीय ग्राहक आयोग दिल्ली खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी तत्काळ प्रकरण निकाली काढून मुलीसह तिच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी ऋतुजाची आई संगीता खारकर तसेच आजोबा हरिभाऊ पाचघरे यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHealthआरोग्य