डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 23:57 IST2018-04-12T23:57:22+5:302018-04-12T23:57:22+5:30

पोलीस स्टेशन देवळी व उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी पो.स्टे परिसरातील जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, सदस्य पोलीस मित्र, पोलीस पाटील यांची उपस्थिती होती.

 Dr. Meeting for Ambedkar Jayanti | डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त बैठक

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त बैठक

ठळक मुद्देकायदा व सुव्यवस्था राखण्याचे शांतता समितीचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : पोलीस स्टेशन देवळी व उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी पो.स्टे परिसरातील जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, सदस्य पोलीस मित्र, पोलीस पाटील यांची उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होवू नये, कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता काय खबरदारी घ्यावी याचे मार्गदर्शन करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. उत्सव काळात कोणीही आक्षेपार्ह पोस्टरर्स लावणार नाही. घोषणा देणार नाही, अशा सूचना केल्या.
प्रास्ताविक देवळीचे ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी केले. देवळी शहर व तालुक्यातील गावातील सामाजिक सलोख्याची भावना कायम राहून धार्मिक एकोपा टिकावा याकरीता सर्व धर्मियांनी सहकार्य करावे. डॉ. आंबेडकर यांचे आदर्श विचार लोकांनी अंगीकारावे अशी उपस्थितांना माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे यांनी शहराची सामाजिक एकोप्याची परंपरा यापुढेही टिकवून ठेवून येणारे सर्व राष्ट्रीय सण एकात्मतेच्या भावनेतून व शांततेत पार पाडतील यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सभेला ७० ते ८० जयंती मंडळाचे सदस्य, पोलीस मित्र आणि पोलीस पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला मिश्रा, ढुमणे, बुटे, पवन झाडे यांनी सहकार्य केले.

शांतता समितीची सभा
तळेगाव (श्या.पं.) - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती सर्व समाजबांधव मोठ्या उत्साहात साजरी करतात. यानिमित्त ठिकठिकाणी मिरवणुकीचे आयोजन केले जाते. या महत्वपूर्ण दिवसाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी पोलीस स्टेशन तळेगावचे ठाणेदार सुरेश भोयर यांनी शांतता कमिटीची बैठक घेतली. या बैठकीला तळेगाव ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील, राजकीय व्यक्ती, प्रतिष्ठीत व्यक्ती, तरुण युवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणेदार भोयर यांनी सर्व पोलीस पाटलांना आवश्यक त्या सूचना केल्या तसेच सर्व ठिकाणी निघणाऱ्या मिरवणुकी शांततेत निघेल. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे सांगितले. या सर्व कार्यक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. प्रास्ताविक ठाणेदार भोयर यांनी केले. आभार दक्षता कमेटीचे अध्यक्ष चंद्रशेखर जोरे यांनी मानले. सरपंच सुनीता जोरे, ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील उपस्थित होते. पीएसआय राठोड, परवेज खान, निलेश पेठकर आदींनी सहकार्य केले.

Web Title:  Dr. Meeting for Ambedkar Jayanti