वर्ध्याचे डॉ. कुशाग्र देशमुख यांचा भटिंडा येथे कोरोनाने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 20:11 IST2021-05-15T20:11:19+5:302021-05-15T20:11:54+5:30

यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलासराव देशमुख यांचे चिरंजीव डॉ. कुश उर्फ कुशाग्र देशमुख (३२) यांचे कोरोना आजाराने भटिंडा (पंजाब) येथे शुक्रवारी दुपारी निधन झाले.

dr kushagra deshmukh died due to covid 19 | वर्ध्याचे डॉ. कुशाग्र देशमुख यांचा भटिंडा येथे कोरोनाने मृत्यू

वर्ध्याचे डॉ. कुशाग्र देशमुख यांचा भटिंडा येथे कोरोनाने मृत्यू

वर्धा : यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलासराव देशमुख यांचे चिरंजीव डॉ. कुश उर्फ कुशाग्र देशमुख (३२) यांचे कोरोना आजाराने भटिंडा (पंजाब) येथे शुक्रवारी दुपारी निधन झाले. त्यांनी चायना येथून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्ली येथील एका रुग्णालयात कार्यरत होते. त्यांच्या पत्नी लेफ्टनंट कर्नल होत्या. भटिंडा येथे कार्यरत पत्नी कोरोनाने आजारी असल्याने तेथे डॉ. कुशाग्र गेले होते. दरम्यान, त्यांना कोरोनाची बाधा झाली आणि शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. कुशाग्र यांच्या पश्चात पत्नी, चिमुकला मुलगा, आई-वडील, बहीण असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Web Title: dr kushagra deshmukh died due to covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.