चारित्र्यावर संशय; दगडाने ठेचून पत्नीची केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 05:00 IST2022-04-13T05:00:00+5:302022-04-13T05:00:22+5:30

आरोपी इमरान खान हा भूगाव ते नांदेड मालवाहू ट्रक चालवायचा. तो मूळचा पुलगाव येथील रहिवासी असून मागील दहा ते १५ वर्षांपासून कुटुंबासह भूगाव येथे वास्तव्यास होता. मृतक कैकशा ही घरी असताना आरोपी पती इमरान हा घरी आला. त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ केली. विवाहितेने शिवीगाळ करण्यास हटकले असता रागाच्या भरात आरोपी पती इमरान याने रस्त्याकडेला असलेला दगड उचलून कैकशाचे डोके ठेचून तिची हत्या केली.

Doubt on character; Killed his wife by crushing her with a stone | चारित्र्यावर संशय; दगडाने ठेचून पत्नीची केली हत्या

चारित्र्यावर संशय; दगडाने ठेचून पत्नीची केली हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : चारित्र्यावर संशय घेत पत्नीच्या डोक्यावर दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास भूगाव येथे घडली. याप्रकरणी सावंगी पोलिसांनी आरोपी पतीस अटक केल्याची माहिती आहे. कैकशा इमरान खान (२१) रा. भूगाव असे मृतक महिलेचे नाव असून आरोपी इमरान खान याला सावंगी पोलिसांनी अटक केली आहे. 
आरोपी इमरान खान हा भूगाव ते नांदेड मालवाहू ट्रक चालवायचा. तो मूळचा पुलगाव येथील रहिवासी असून मागील दहा ते १५ वर्षांपासून कुटुंबासह भूगाव येथे वास्तव्यास होता. मृतक कैकशा ही घरी असताना आरोपी पती इमरान हा घरी आला. त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ केली. विवाहितेने शिवीगाळ करण्यास हटकले असता रागाच्या भरात आरोपी पती इमरान याने रस्त्याकडेला असलेला दगड उचलून कैकशाचे डोके ठेचून तिची हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडून असलेल्या पत्नीला पाहून आरोपीने तेथून पळ काढला. याची माहिती सावंगी पोलिसांना मिळाली असता सावंगी पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळक आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ तपासचक्र फिरवून आरोपी इमरान खान याला ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावंगी येथील रुग्णालयात पाठविला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

 

Web Title: Doubt on character; Killed his wife by crushing her with a stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.