अतिवृष्टीमुळे वर्ध्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 15:11 IST2019-08-01T14:53:10+5:302019-08-01T15:11:20+5:30
येथील सिव्हील लाईन भागातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या छताला गळती लागल्याने तेथील कामकाज ठप्प झाले आहे.

अतिवृष्टीमुळे वर्ध्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला गळती
ठळक मुद्देकामकाज झाले ठप्पभिंती ओल्या झाल्याने काम करण्यास कर्मचाऱ्यांचा नकार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: येथील सिव्हील लाईन भागातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या छताला गळती लागल्याने तेथील कामकाज ठप्प झाले आहे. छतावर साठणारे पावसाचे पाणी पहिल्या माळ्यावर असलेल्या कार्यालयात ठिकठिकाणी गळत असल्याने आणि भिंतीही पूर्णपणे ओल्या झाल्याने भिंतीला स्पर्श केल्यानंतर विद्युत प्रवाहाचा झटकाच लागतो. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांनी सदर कार्यालयात काम करण्यास नकार देत याच इमारतीच्या खालील खोलीत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, छताच्या गळतीमुळे संपूर्ण कामकाजच ठप्प झाले होते, हे विशेष.