शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: मुंबईकरांवर पाणीसंकट, १५ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय, जलाशयात घट
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७०८ दिवे बंदावस्थेत

By admin | Updated: December 6, 2014 22:52 IST

अपारंपरिक उर्जा स्त्रोतांना बळकटी देण्याकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने आठही तालुक्यातील ५१७ ग्रामपंचायतींकरिता सौरउर्जेवर चालणारे २ हजार ४४ पथदिवे मंजूर केले. यावर जि.प.चे लाखो रुपये खर्च झाले.

५२७ ग्रा.पं.मध्ये लावले २,०४४ सौरदिवे
वर्धा : अपारंपरिक उर्जा स्त्रोतांना बळकटी देण्याकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने आठही तालुक्यातील ५१७ ग्रामपंचायतींकरिता सौरउर्जेवर चालणारे २ हजार ४४ पथदिवे मंजूर केले. यावर जि.प.चे लाखो रुपये खर्च झाले. मात्र आजच्या घडीला या दिव्यांखाली अंधारच असल्याचे चित्र गावागावांत आहे. या पथदिव्यांपैकी आजच्या घडीला ७०८ दिवे बंद असून केवळ १,३३८ दिवे सुरू असल्याने जि.प. पैसा वाया गेल्याची चर्चा आहे.
वीजेचे दर वाढत असल्याने ग्रामपंचायतींना त्यांचा भरणा करणे कठीण जाते. शिवाय मध्यंतरी अपारंपरिक उर्जेचे बळकटीकरण करण्याच्या शासनाकडून सूचना आल्या होत्या.
यानुसार जिल्हा परिषदेच्यावतीने विविध फंडाच्या माध्यमातून आठही तालुक्यातील ग्रामपंचायतींना सौरउर्जेवर चालणारे दिवे देण्याचा निर्णय घेतला. यावर परिषदेच्यावतीने एक रक्कमही निश्चित करण्यात आली.
यानुसार सर्वच ग्रामपंचायतीत एकूण दोन हजार ४४ दिवे मंजूर लावण्यात आले; मात्र त्यांच्या देखभाल दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हे पथदिवे बंदावस्थेत आहेत. दिवे बंद असल्याने अपारंपरिक उर्जेचे बळकटीकरण करण्याच्या योजनेसह ग्रामपंचायतींना बसणारा वीज देयकाचा फटका कमी करण्याच्या योजनेला पुरता विराम लागला आहे. या दिव्याच्या बॅटऱ्या व सोलर पॅनल चोरी गेल्याने ते बंद असल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)