शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर रोग, पाने पिवळी पडली; शेतकऱ्यापुढे नवे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 17:28 IST

उत्पादनात घट होण्याची शक्यता : उपाययोजना सुचविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : तालुक्यातील अनेक गावांत जोमात वाढलेल्या कपाशीवर रोग आला आहे. सततच्या पावसामुळे कपाशी पीक पिवळे पडले असल्याचा अंदाज जाणकारांचा अंदाज आहे. आणखी पाऊस आल्यास हे पीक हातचे जाण्यासह उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तालुक्यात हजारो हेक्टरवर कपाशी पिकांची लागवड करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस पडला नसल्याने पेरण्यांना विलंब झाला. पेरणीनंतर तुरळक झालेल्या पावसाने कपाशी पिकांनी तग धरला. तर ज्याच्याकडे ओलिताची सोय होती त्यांनी ओलित करून कपाशी जगविली. तर कोरडवाहू शेतकऱ्यांनी ४० टक्क्यांपर्यंत डोब आली होती. त्यानंतर झालेल्या समाधानकारक पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली होती. मात्र, त्यानंतर लागून पडलेल्या पावसाने पिकांची पुरती वाट लावली. सध्या घडला कपाशी फुले पात्यावर आहेत. असे असताना परतीच्या पावसाचा फटका तालुक्याला बसला आहे. 

दिवसा ऊन, रात्री ढगाळ वातावरण असल्याने शेतात शेवाळ निर्माण झाले. परिणामी कपाशीचे पीक पिवळे पडत आहे. हे वातावरण कीड, रोगांना पोषक ठरत असून, रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कपाशीवर बोंडअळी तर आलीच रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भावही वाढला आहे; तणनाशके निष्प्रभावी ठरत असल्याने पिकांमध्ये तण प्रचंड वाढले आहे. कीड, रोग, शेतातील तणांचे व्यवस्थापन, नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी जहाल, अत्यंतिक विषारी कीटकनाशके फवारणी करीत आहे. परिणामी शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे. असे असताना अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

मार्गदर्शन करण्याची मागणी दरवर्षी कपाशीवर व सोयाबीनवर काही ना काही रोग येतो. यंदाही कपाशीवर रोग आला आहे. पाने पिवळी पडत आहे. यंदा जमिनीत चांगल्या पावसामुळे ओलेपणा कायम आहे व ऊनही चांगले तापत आहे. त्यामुळे कदाचित कपाशीवर रोगांनी अटॅक केल्याची शक्यता नाकारता येत नाही. कपाशीची पाने पिवळी पडल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. वळीच उपायोजना झाल्या नाही तर हातचे पीक जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

संकटाशी दोन हात हंगामात अतिवृष्टी आणि आता परतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान केले. यात कपाशीवर आलेल्या कीडरोगाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली असून उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. लागवडीला लागलेला खर्च आणि बाजारात मिळणारा हमीभाव यात मोठी तफावत असल्याने संकटाशी दोन हात करताना शेतकऱ्यांच्या आता जिव्हारी लागत असल्याचे बोलले जात आहे.

दिवाळी सणही फिकाच दिवाळी सनापूर्वी खरिपातील पीके निघण्यास सुरवात होते. यंदा सोयाबिनने दगा दिला. त्यात भाव पाडून व्यापारी शेतमालाची खरेदी करीत आहे. त्यामुळे दिवाळी सारखा सण सूनाच जाण्याची चिन्ह दिसून येत आहे. लेकी बाळीला चोरी बांगडी घेण्यासाठी उधार घेण्याची वेळ ओढावली आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाcottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेती