शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

शिथिलतेनंतर जनजीवन पूर्वपदाच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST

बजाज चौकतून शिवाजी चौककडे जाणारा मार्ग दक्षता म्हणून बंद करण्यात आल्याने सकाळी ९ वाजताच्या सुमारास वर्धा शहरातील दुर्गा टॉकीज मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. विशेष म्हणजे हा परिसर वर्धा शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. तर मुख्य मार्गावरील ठाकरे मार्केट चौकात बाजारेपठेतील गर्दी टाळण्यासाठी बॅरिकेटस् लावण्यात आले होते.

ठळक मुद्दे४५ दिवसांनंतर दुकाने उघडली : काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन तर काही ठिकाणी उडाला फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन... लॉकडाऊनच्या ४४ व्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडून काही दुकाने उघडण्याबाबत थोडी शिथिलता...त्यानंतर लॉकडाऊनचा ४५ वा बुधवार हा दिवस उजाडला अन् वर्धेकरांनी विविध साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेकडे धाव घेतली. यामुळे काही ठिकाणी नागरिकांची थोडी गर्दी झाली होती. तर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. एकूणच शिथिलतेनंतर जनजीवन पुर्वपदाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे बघावयास मिळाले.बुधवारी दिवस उजाडल्यानंतर वर्धेतील व्यावसायिकांनी प्रशासनाकडून दिलेल्या वेळेत आपली मोबाईल शॉपी, इलेक्ट्रानिक्स, इलेक्ट्रीक, स्टेशनरी, गिफ्ट हाऊस, जनरल स्टोअर्स, बुक स्टॉल, झेरॉक्स, भांड्याची दुकाने, चप्पल-जोड्याची दुकाने, ऑटोमोबाईल्स, गॅरेज, स्पेअर पार्ट, प्रिंटींग, वेल्डिंग, ई-सेवा केंद्र, कापड व रेडिमेट कपड्याची दुकाने उघडली. जसजसा सुर्यनारायण डोक्यावर येत होता तस तसे नागरिक विविध साहित्याची खरेदी करून घरचा रस्ता धरत होते. बजाज चौकतून शिवाजी चौककडे जाणारा मार्ग दक्षता म्हणून बंद करण्यात आल्याने सकाळी ९ वाजताच्या सुमारास वर्धा शहरातील दुर्गा टॉकीज मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. विशेष म्हणजे हा परिसर वर्धा शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. तर मुख्य मार्गावरील ठाकरे मार्केट चौकात बाजारेपठेतील गर्दी टाळण्यासाठी बॅरिकेटस् लावण्यात आले होते. शिवाय तेथे पोलिसांचीही नियुक्ती करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेत गर्दी होऊ नये म्हणून तसेच कुठलीही अनुचित परिस्थिती ओढावल्यावर परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविता यावे म्हणून सोशालिस्ट चौकातून सराफा लाईनकडे जाणाऱ्या मार्गावर तसेच मुख्य बाजारपेठेतील आणखी काही ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून बॅरिकेटस् लावण्यात आले होते. बुधवारी व्यावसायिकांनीही त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानासमोर ग्राहकांना हात धुण्याची सुविधा तसेच सॅनिटाइजर ठेवले होते. हात निर्जंतुक केल्यावरच ग्राहकांना दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रवेश दिल्या जात होता. तर काही दुकानांमध्ये अचानक गर्दी वाढल्याने आणि दुकाने छोटी असल्याने तेथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे बघावयास मिळाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या