संस्कृतीच्या उत्थानासाठी हिंदीचा विकास आवश्यक
By Admin | Updated: July 7, 2014 23:44 IST2014-07-07T23:44:49+5:302014-07-07T23:44:49+5:30
देशातील बहुतांश राज्याने हिंदी भाषेला संपर्क भाषा म्हणून स्वीकारले आहे. राज्याच्या संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार करुन विकास साध्य करायचा असेल तर हिंदीचा विकास होणे आवश्यक आहे.

संस्कृतीच्या उत्थानासाठी हिंदीचा विकास आवश्यक
कुलसचिव देवराज यांचे प्रतिपादन : राष्ट्रभाषा प्रचार समितीचा स्थापना दिन
वर्धा : देशातील बहुतांश राज्याने हिंदी भाषेला संपर्क भाषा म्हणून स्वीकारले आहे. राज्याच्या संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार करुन विकास साध्य करायचा असेल तर हिंदीचा विकास होणे आवश्यक आहे. हिंदी भाषेचा प्रचार करण्यात पूर्वोत्तर राज्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलसचिव देवराज यांनी केले.
ते राष्ट्रभाषा प्रचार समिती स्थापना दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. नागालॅण्ड राज्यात हिंदीचा प्रसार करणारे तेजमन यांचा यावेळी उल्लेख केला. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी प्रधानमंत्री प्रा. अनंतराम त्रिपाठी होते. तसेच व्यासपीठावर परीक्षामंत्री प्रकाश बाभळे, प्रचारमंत्री डॉ. हेमचंद्र वैद्य, नरेंद्र दंढारे यांची प्रमुख उपस्थिती होती. देशाला एकसुत्रेत बांधणारी, भारतीय जनमानसाला जोडणारी सांस्कृतिक, राजकीय जनताला जोडणारी हिंदी भाषाच आहे, असे विचार त्रिपाठी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वैद्य यांनी केले. संचालन दंढारे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, पूर्वोत्तर राज्यातील विद्यार्थी, प्रांतीय संचालक, समितीचे पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ता, शहरातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. महोत्सवात डॉ. नृृपेंद्र मोदी, के. के. त्रिपाठी, बी. एस. मिरगे, डॉ. सोहम पंड्या, सुनीती बेंदूर, वसंत वाकाडे, वैद्यनाथ अय्यर, प्रा. मेहरे आदी मान्यवरांनी उपस्थिती होती. नरुला चाँग, लँडिना, सुरेंद्र जैन व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)