शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 32.32 टक्के लसीकरण तरीही ‘डेल्टा प्लस’ची भीती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 05:00 IST

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न हाेत आहे. परंतु, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्याला शासनाकडून तोकडा लस साठ्याचा पुरवठा करून लस कोंडीच केली जात आहे. लस तुटवड्यामुळे गुरुवारी जिल्ह्यात केवळ पाच केंद्रांवरून लाभार्थ्यांना कोविडची लस देण्यात आली, तर शुक्रवारी बोटावर मोजण्याइतकीच केंद्रे सुरू होती. आरोग्य विभागाने लसीच्या एक लाख डोसची मागणी शासनाकडे नोंदविली आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासन हाय अलर्टवर : पुन्हा शासनाकडून केली जातेय वर्धा जिल्ह्याची लसकोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात आतापर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लसीचे ३ लाख ७८ हजार ३९४ डोस लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत. त्याची टक्केवारी ३२.३२ असली तरी, कोविडच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटची भीती कायम आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोविडच्या या नव्या व्हेरिएंटचा एकही रुग्ण सापडलेला नसून आरोग्यसह जिल्हा प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ५ हजार ४१९ व्यक्तींना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला, तर ७२ हजार ९७५ व्यक्तींना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न हाेत आहे. परंतु, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्याला शासनाकडून तोकडा लस साठ्याचा पुरवठा करून लस कोंडीच केली जात आहे. लस तुटवड्यामुळे गुरुवारी जिल्ह्यात केवळ पाच केंद्रांवरून लाभार्थ्यांना कोविडची लस देण्यात आली, तर शुक्रवारी बोटावर मोजण्याइतकीच केंद्रे सुरू होती. आरोग्य विभागाने लसीच्या एक लाख डोसची मागणी शासनाकडे नोंदविली आहे. पण शुक्रवारी लस साठ्याचा पुरवठा झाला नव्हता. जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेचा प्रतिसाद लक्षात घेता शासनाकडून मुबलक लससाठा उपलब्ध होण्याची गरज आहे.  

१८ ते ४४ वयोगटातील ५० हजार व्यक्तींना व्हॅक्सिनेशन

- जिल्ह्यात आतापर्यंत कोविड लसीचे ३ लाख ७८ हजार ३९४ डोस लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत. या लाभार्थ्यांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील सुमारे ५० हजार व्यक्तींचा समावेश आहे.- जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळत असला तरी, शासनाकडून अतिशय तोकडा लसीचा साठा पाठविला जात  आहे.

कारंजा तालुक्यात कमी, तर वर्धा तालुक्यात झाले सर्वाधिक व्हॅक्सिनेशन- जिल्ह्यात आतापर्यंत ३२.३२ टक्के लसीकरण झाले आहे. आठही तालुक्यांचा विचार केल्यास, वर्धा तालुक्यात सर्वाधिक, तर कारंजा (घा.) तालुक्यात सर्वात कमी व्हॅक्सिनेशन झाले आहे. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस