शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिंडीच्या माध्यमातून रेटली जुन्या पेन्शनची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 05:00 IST

१ नोव्हेंबर २००५ पासून नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली. या आधारावरच राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अंशत अनुदानित खाजगी शाळेत नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन नाकारण्यात आली. महाराष्ट्र शासनाने नियम क्रमांक २ पोटनियम एक व खंड (ब) व नियम क्रमांक १९ नियम क्रमांक २० मधील पोट कलम दोन मध्ये १० जुलै २०२० रोजी प्रस्तावित सुधारणा करून नियमबाह्यपणे अधिसूचना प्रकाशित केली.

ठळक मुद्देशिक्षकांचे आंदोलन : वर्धा-सेवाग्राम केला पायी प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवीन परिभाषित अंशदान सेवानिवृत्त वेतन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणी करता शुक्रवारी गांधी जयंतीचे औचित्य साधून अजय भोयर यांच्या नेतृत्वात म. रा. शिक्षक परिषद तक्रार निवारण समिती व डीसीपीएस/ एनपीएस पेन्शन बचाव कृती समितीच्यावतीने वर्धा ते सेवाग्राम आश्रम आत्मक्लेश पायी पेन्शन दिंडी काढण्यात आली.१ नोव्हेंबर २००५ पासून नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली. या आधारावरच राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अंशत अनुदानित खाजगी शाळेत नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन नाकारण्यात आली. महाराष्ट्र शासनाने नियम क्रमांक २ पोटनियम एक व खंड (ब) व नियम क्रमांक १९ नियम क्रमांक २० मधील पोट कलम दोन मध्ये १० जुलै २०२० रोजी प्रस्तावित सुधारणा करून नियमबाह्यपणे अधिसूचना प्रकाशित केली. शिवाय राज्यातील समस्त शिक्षक कर्मचाऱ्यांना नियमानुसार देय असलेली जुनी पेन्शन योजना संपुष्टात आणली. याचा निषेध करण्याकरिता व राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आज ही आत्मक्लेश पायी दिंडी आयोजित करण्यात आली होती. दिंडीचा समारोप सेवाग्राम आश्रमात आत्मक्लेश व प्रार्थना करून तसेच पालकमंत्र्यांना निवेदन देऊन करण्यात आला. आंदोलनात कुंडलिक राठोड, मुकेश इंगोले, संजय बारी, सुनील गायकवाड, राज धात्रक, टोपले, मनीष मारोटकर, अमोल वाशीमकर, वाघ आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Teacherशिक्षकPensionनिवृत्ती वेतन