कोरडा दुष्काळ जाहीर करावा
By Admin | Updated: July 17, 2014 00:25 IST2014-07-17T00:04:41+5:302014-07-17T00:25:26+5:30
पूर्णा : राज्यकर्ते हे शेतकऱ्यांची मुले असून, त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आजही रडत आहे़

कोरडा दुष्काळ जाहीर करावा
पूर्णा : राज्यकर्ते हे शेतकऱ्यांची मुले असून, त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आजही रडत आहे़ सहकारी साखर कारखान्यातून मिळणारे उत्पन्न कोट्यवधींच्या घरात असून, हे कारखाने तोट्यात कसे जातात, असा सवाल उपस्थित करीत मुख्यमंत्र्यांनी राज्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आ़ बाळा नांदगावकर यांनी केली़
गंगाखेड विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गट अध्यक्ष, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांचा मेळावा १५ जुलै रोजी पूर्णा येथे पार पडला़ या मेळाव्यास आ़ बाळा नांदगावकर, माजी आ़ रोहिदास चव्हाण, मनसे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, जिल्हाध्यक्ष बालाजी मुंडे, बालाजी देसाई, महिला जिल्हाध्यक्ष सुशिला चव्हाण, प्रशांत कापसे, सचिन पाटील, उपसभापती नंदकुमार डाखोरे, दत्ता गायकवाड, धनंजय भेंडेकर आदी उपस्थित होते़ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ़ नांदगावकर म्हणाले, प्रत्येक उमेदवार हे राज ठाकरे आहेत असे समजून संघटनेसाठी एकदिलाने कामाला लागा़ माजी आ़ रोहिदास चव्हाण म्हणाले, राज्यातील जनतेला नवा पर्याय म्हणून मनसे पुढे येत आहे़ जिल्हाध्यक्ष बालाजी मुंडे, बालाजी देसाई यांचीही यावेळी भाषणे झाली़ प्रशांत कापसे यांनी प्रास्ताविक केले़ यावेळी पूर्णा तालुकाध्यक्ष राम मोरे, शहराध्यक्ष माऊली कदम, संदीप अळनुरे, चंद्रकांत लोखंडे, सदानंद फड, किशोन देसाई, गणेश कदम, बालाजी डाखोरे, दशरथ काळबांडे, शिवहार सोनटक्के, मयूर दर्गू, राज ठाकर, जगदेव सोनटक्के, त्र्यंबक बोबडे, नामदेव कदम आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
मनसेचे शक्ती प्रदर्शन
या मेळाव्याच्या निमित्ताने मनसेने पूर्णा शहरात रस्त्यालगत कमानी, झेंडे उभारून आणि झिरो टी पॉर्इंटपासून मोटारसायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले़