शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकरी पुत्राचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

सकाळी मृताचे वडील दीलेश मसराम शेतामध्ये माकडांना हाकलून लावण्यासाठी गेले. आणि घरी परतल्यावर मुलग प्रज्वलला शेतात माकडांना हाकलून लावण्यासाठी पाठविले. दरम्यान, बाजूच्या शेतकऱ्याने तारांच्या कुंपणात वीज प्रवाह सोडलेला होता. धुऱ्याच्या बाजूलाच असलेल्या आंब्याच्या झाडावर माकडे होती. त्यामुळे प्रवल त्या धुऱ्याजवळा गेला होता. मात्र त्याला धुऱ्यावर लावलेल्या वीज प्रवाहित तारांबाबत माहिती नसल्याने या वीजतारांचा स्पर्श होऊन प्रज्वलचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देहरणखुरी शिवारातील घटना : शेतकऱ्याने बचावासाठी मृतदेह टाकला दुसऱ्या धुऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील हरणखुरी शिवारात पीक संरक्षणासाठी लावलेल्या प्रवाहित वीजतारेला स्पर्श होऊन शेतकरी पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.प्रज्वल नीलेश मसराम (१४) असे मृत शेतकरी पुत्राचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार हरणखुरी येथील शेतकरी रामचंद्र मुळे यांनी स्वत:च्या शेतात जगंली श्वापंदापासून पिकांच्या संरक्षणाकरिता शेताच्या धुऱ्यावर असलेल्या तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडला होता.सकाळी मृताचे वडील दीलेश मसराम शेतामध्ये माकडांना हाकलून लावण्यासाठी गेले. आणि घरी परतल्यावर मुलग प्रज्वलला शेतात माकडांना हाकलून लावण्यासाठी पाठविले. दरम्यान, बाजूच्या शेतकऱ्याने तारांच्या कुंपणात वीज प्रवाह सोडलेला होता. धुऱ्याच्या बाजूलाच असलेल्या आंब्याच्या झाडावर माकडे होती. त्यामुळे प्रवल त्या धुऱ्याजवळा गेला होता. मात्र त्याला धुऱ्यावर लावलेल्या वीज प्रवाहित तारांबाबत माहिती नसल्याने या वीजतारांचा स्पर्श होऊन प्रज्वलचा जागीच मृत्यू झाला. शेजारचे शेतकरी रामचंद्र मुळे हे शेतात गेले असता धुऱ्यावर प्रज्वलला मृतदेह त्यांना दिसून आला. आपल्यावर नाव येऊ नये म्हणून त्यांनी प्रज्वलचा मृतदेह आपल्या धुऱ्यावरून उचलून प्रज्वलच्या शेताच्या धुऱ्यावर देऊन ठेवला. या घटनेविषयीची माहिती लाईनमन महेश चतारे यांना माहिती दिली. त्यांच्यामार्फत प्रज्वलचा मृतदेह स्वत:च्या शेतात पडून असल्याची माहिती दिली. मृताच्या वडिलांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे, ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घटनास्थळी प्रज्वलचा मृत्यू रामचंद्र मुळे यांच्या शेतात झाल्याचे निष्पन्न झाले.यावेळी पोलिसांनी धुºयावर लावलेला तार जप्त करून शेतकरी रामचंद्र मुळे यांना ताब्यात घेतले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणात अधिक तपास ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात धनंजय पांडे, उमेश हरणखेडे, राजू ठाकरे, करीत आहेत. घटनेची चौकशी करण्याची मागणी पित्याने केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूelectricityवीज