Day-long burglary in teacher colony | शिक्षक कॉलनीत भरदिवसा घरफोडी

शिक्षक कॉलनीत भरदिवसा घरफोडी

ठळक मुद्देबंद घराला गेले लक्ष्य : सोन्याच्या दागिन्यांसह रोख लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घाडगे) : बंद असलेल्या घराला लक्ष्य करीत चोरट्यांनी घरातील कपाटातून सोन्याच्या दागिने आणि ६० हजार रुपये रोख लंपास केली. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील शिक्षक कॉलनीत रविवारी सकाळी साडेदहा वाजता दरम्यान घडली.
प्रकाश चौधरी रा. शिक्षक कॉलनी, हे परिवारासह नागपुरला दवाखान्यात गेले होते. त्यामुळे चोरट्यांनी बंद असलेल्या घराच्या मुख्य दाराची कडी तोडून घरात प्रवेश केला. शयनगृहातील कपाटातून १५० गॅ्रम सोन्याचे दागिने व ६० हजार रुपये रोख घेऊन पोबारा केला. सायंकाळी चौधरी परिवार घरी परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
शिक्षक कॉलनी ही महामार्गावरच असल्यामुळे यापूर्वीही अनेकदा चोऱ्या झाल्या आहेत. आताही भरदिवसा चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी या भागात सुरक्षा वाढविण्याची शिक्षक कॉलनी वासीयांक डून केली जात आहे.

Web Title: Day-long burglary in teacher colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.