शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची गुढीपाडवा सणावर गडद छाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST

सुवर्णालंकार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, कपडे, मिठाई आदी दुकानांसह सध्या विविध बाजारपेठा ओस पडलेल्या आहेत. कोरोनामुळे शुभ मुहूर्तावर नव्या वस्तूंची खरेदीही करता येणार नाही. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रासह भारतातील अनेक ठिकाणी आनंदात आणि उत्साहात गुढीपाडवा साजरा केला जातो. दारी गुढी उभारली जाते.

ठळक मुद्देबाजारपेठच बंद असल्याने साधेपणाने साजरा होणार सण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गुढीपाडवा...सुख, समृद्धी आणि मांगल्याचा सण...हिंदू नववर्षाची सुरुवात अन् साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण... बुधवारी म्हणजे आज हा सण महाराष्ट्रासह देशातील वेगवेगळ्या भागात साजरा होणार आहे. मात्र, मांगल्याची आणि समृद्धीची कामना करणाऱ्या या सणावर कोरोनाचे गडद सावट असून, सणासाठी खरेदीची दुकाने बंद असल्याने घरच्या घरी अगदी साधेपणाने गुढीपाडवा साजरा होणार आहे. सुवर्णालंकार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, कपडे, मिठाई आदी दुकानांसह सध्या विविध बाजारपेठा ओस पडलेल्या आहेत. कोरोनामुळे शुभ मुहूर्तावर नव्या वस्तूंची खरेदीही करता येणार नाही.हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रासह भारतातील अनेक ठिकाणी आनंदात आणि उत्साहात गुढीपाडवा साजरा केला जातो. दारी गुढी उभारली जाते.घरांमध्ये, कार्यालयांमध्ये गुढी उभारून तिला गोड नैवैद्य दाखविला जातो. सायंकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी उतरविली जाते. या दिवशी घरोघरी जात आप्तेष्टांना नववर्षाचे अभीष्टचिंतन केले जाते. मात्र, कोरोनामुळे लोकांनी सोशल मीडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असून या दिवशी नवीन वस्तूची खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्णलंकार आदीची खरेदी होते. कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने सरकारने आता संचारबंदीसारखे कठोर पाऊल उचलल्याने गुढीपाडवा घरच्या घरीच साजरा करावा लागणार आहे. राज्ळ शासनाने सोमवारपासून संचारबंदी लागू केल्याने बाजारात खरेदीदारांअभावी शुकशुकाट आहे.पूजेच्या साहित्याची दुकाने बंदगुढी उभारण्यासाठी बांबूची काठी, रेशमी वस्त्र अथवा साडी, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी, तांब्याचा गडू, रांगोळी, हळदी-कुंकू, अगरबत्ती, कापूर, निरांजन अशा पूजेच्या साहित्याची दुकाने बंद आहेत. त्यामुळे शहरात पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी लोकांची वर्दळ नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या