शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सदोष पूल बांधकामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:01 IST

सालोड क्षेत्रातील बाळापूर येथील कालव्यावरील पुलामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती संकटात आली आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी प्रत्यक्ष मौक्यावर जाऊन पुलाची पाहणी करीत आमदार दत्तक गावातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणल्या. पुल बांधताना विभागाने दोन छोटे पाईप टाकले आहे.

ठळक मुद्देनिम्न वर्धा कालवा परिसर : आमदारांनी जाणली शेतकऱ्यांची अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सालोड- माळेगांव-वडद मार्गावर असलेल्या शेत जमिनीवरून निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा गेला आहे. परिसरातील नाल्यावरून कालवा गेल्याने निम्न वर्धा कालवे विभागाकडून पुलाची निर्मिती करण्यात आली. परंतु पुलाची निर्मिती सदोष असल्याने लगतच्या शेतकऱ्यांची शेतजमीन संकटात आली आहे.सालोड क्षेत्रातील बाळापूर येथील कालव्यावरील पुलामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती संकटात आली आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी प्रत्यक्ष मौक्यावर जाऊन पुलाची पाहणी करीत आमदार दत्तक गावातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणल्या. पुल बांधताना विभागाने दोन छोटे पाईप टाकले आहे. नाल्याची खोली व रूंदी अधिक असल्याने या छोटया पाईप मधून पाण्याचा निचरा होताना अनेक अडचणी निर्माण होत आहे. मुसळधार पावसामुळे पाण्यासोबतच काडी कचरा देखील वाहत आला. परंतु पाईप छोटे असल्याने हा कचरा पाईपच्या मुखाशी अडकल्याने पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला. परिणामी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात देखील पाणी जमा झाल्याने त्यांचे नुकसान झाले. गत वर्षी सुद्धा असाच प्रकार घडल्याने अंकुश झाडे यांचे प्रचंड नुकसान झाले होते. कालव्यावरील पुल सदोष असल्याने त्याची दुरूस्ती करून मोठे पाईप टाकण्यात यावे अथवा नव्याने पुल बांधण्यात यावा,अशी मागणी शेतकऱ्यांसह भागोदय पाणी वापर संस्था, बाळापूर कार्यकारी अभियंता निम्न वर्धा कालवे विभाग यांच्याकडे केली होती. यावर संबधित विभागाने पाणी जमा होणार नसल्याचे संबधितांना कळविले होते.परंतु पाणी अडल्याने पीडित शेतकºयांना आमदार डॉ. पंकज भोयर यांच्यासह संबधित विभाग, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. यासंदर्भात शेतकऱ्यांनी व पाणी वाटप संस्थेने पाठपुरावा करून देखील संबधित विभाग डोळेझाक करीत असल्याचे शेतकऱ्यांनी आमदार डॉ.पंकज भोयर यांना भेटी दरम्यान सांगितले.आमदार भोयर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन शेतकºयांच्या कैफियत ऐकून घेतली. याबाबत संबधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन आमदार भोयर यांनी दिले. यावेळी भाजपचे माजी तालुका प्रमुख आशिष कुचेवार,पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष मोतीराम टिपले, बालू सागरे ,मारोतराव वैतागे, संदीप झाडे, विनोद महाकाळकर, माणिक हजारे व शेतकरी बांधव उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी