शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाच्या तडाख्याने पिकांचे नुकसान

By admin | Updated: September 20, 2015 02:32 IST

गत चार दिवसांपासून तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे. पावसाच्या तडाख्याने तालुक्यातील कापूस व सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.

शेतकरी हतबल : हातात आलेले पीक जाण्याची भीतीसमुद्रपूर : गत चार दिवसांपासून तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे. पावसाच्या तडाख्याने तालुक्यातील कापूस व सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. हातात येणारे पीक भूईसपाट होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.यावर्षी निसर्गाने साथ दिल्याने पिके बऱ्यापैकी बहरली होती; पण अचानक वादळी पावसाने थैमान घालून पिकांची धुळधान केली आहे. तालुक्यात कपाशी पिकांच्या पात्या गळाल्या असून वादळामुळे पऱ्हाटी पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. सोयाबीन पीक नुकतेच सवंगण्यावर आले होते. शेंगा भरलेल्या सोयाबीन पिकाला कोंब फुटल्याचेही दिसून येत आहे. यामुळे सोयाबीनही हातचे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. यंदाही शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढणार तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनानी शेतकऱ्यांच्या नुकसानीची बाब गंभीरतेने घेणे गरजेचे झाले आहे. काही दिवसांत कपाशीचे हमीभाव जाहीर होतील. यात गतवर्षी -प्रमाणेच ५० रुपये वाढ देऊन थट्टा केल्यास शेतकऱ्यांना जगणेच कठीण होणार आहे. यामुळे कापसाला पाच ते सहा हजार रुपये क्विंटल भाव देत शासनानेच खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)हमीभाव वाढल्यास कमी होणार कर्जाचा भारकृषिप्रधान देशात शेतकरीविरोधी व व्यापारी हिताचे धोरण राबवित कापसाचा हमीभाव जाहीर केला जातो. यात प्रत्येक वर्षी ५० ते १०० रुपये वाढ करीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जातात. यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईतून बाहेर निघत नसल्याचा आरोप होत आहे. गतवर्षी ५० रुपयेच वाढ करीत ४०५० रुपये हमीभाव जाहीर केला. यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे. शेतकऱ्यांना तारायचे असेल तर शेतकऱ्यांना हमीभावात भरीव वाढ देणेच गरजेचे झाले आहे.‘शेतकरी सुखी तर जग सुखी’ अशी म्हण प्रचलित होती; पण या म्हणीला अर्थच राहिला नाही. शेतकऱ्यांची फसवणूक करीत अल्प भावात पांढरे सोने खरेदी करण्याचा घाट घातला जात आहे. सोयाबीनलाही विशेष भाव मिळत नाही. यामुळे शेतमालाचे हमीभाव वाढविणे गरजेचे आहे.