सायबर सेलकडे 11 कर्मचारी; 97 गुन्हे उघडकीस आणण्यात आले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 05:00 IST2021-03-12T05:00:00+5:302021-03-12T05:00:22+5:30

मागील वर्षी कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन घोषीत करण्यात आले होते. मात्र, या कालावधीत सायबर भामट्यांनी नागरिकांच्या सोशल साईटवर दरोडा टाकून अनेकांची फसवणूक केली. सोशल साईटचा दुरपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बॅंक ग्राहकांना आपली शिकार बनवून डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड व एटीएम कार्डाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांच्या बॅंक खात्यातून रक्कम लंपास केली जात आहे.

Cyber Cell has 11 employees; 97 crimes were uncovered | सायबर सेलकडे 11 कर्मचारी; 97 गुन्हे उघडकीस आणण्यात आले यश

सायबर सेलकडे 11 कर्मचारी; 97 गुन्हे उघडकीस आणण्यात आले यश

ठळक मुद्दे१३ महिन्यांतील कार्यवाही : अनेक नागरिक तक्रारी करत नसल्याची खंत

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सोशल मीडिया साईटवरून फोन पे, गुगल पे, एटीएम फ्राॅड आदी विविध प्रकारे नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करण्यात येते. सायबर सेलकडून तत्काळ तक्रारींची दखल घेत निपटारा करण्याचे काम केले जाते. मागील १३ महिन्यात ऑनलाईन फसवणूक आणि विविध ऑनलाईन प्रकरणात तब्बल ९७ प्रकरणे दाखल झाली असून ६२ लाख ६१ हजारांची रक्कम लंपास केल्याचे पुढे आले. मात्र, सर्व ९७ ही प्रकरणे उघडकीस आणण्यात पोलीस विभागाला यश आले आहे.
मागील वर्षी कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन घोषीत करण्यात आले होते. मात्र, या कालावधीत सायबर भामट्यांनी नागरिकांच्या सोशल साईटवर दरोडा टाकून अनेकांची फसवणूक केली. सोशल साईटचा दुरपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बॅंक ग्राहकांना आपली शिकार बनवून डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड व एटीएम कार्डाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांच्या बॅंक खात्यातून रक्कम लंपास केली जात आहे. फेसबूकवर फेक अकाऊंट तयार करून पैसे उकळविण्याचा धंदा सायबर भामट्यांकडून सुरू आहे. यासंदर्भात नागरिकांची जनजागृती करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलद्वारा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात जनजागृती करण्यात येत असली तरी ग्राहकांनी सावध राहण्याची गरज आहे.
आलेल्या गुन्ह्यांचा सायबर सेलचे अधिकारी व कर्मचारी सखोल तपास करतात. मोबाईलवरून बॅंकिंगचे आर्थिक गुन्हे, चोरीला गेलेल्या मोबाईलचे लोकेशन पाहून चोरट्यापर्यंत पोहोचणे, बक्षीस लागले आहे असे सांगून सर्वसामान्यांची फसवणुक करणे असे प्रकार घडत आहेत. 
मोबाईलच्या सहाय्याने मटका घणे, सट्टा लावणे आदी प्रकारही सायबर गुन्ह्यांमध्ये येत आहेत. 
फेसबूक, इन्स्ट्राग्राम, टि्वटर आदी सोशल मीडियाच्या साईटवरून आक्षेपार्ह मजकूर लिहिणी, फेक प्राेफाईल तयार करण्याच्या घटनाही घडत चालल्या असून पोलीस विभागाकडुन अशांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू आहे.
 

पोलिसांकडून जनजागृती, तरीही गुन्हे वाढतीवरच
जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत एटीएम फ्राॅड, ओटीपी, ओएलएक्स, इंटरनेट बॅंकींग, सायबर बुलिंग, फेक प्राेफाईल, जाॅब फ्राॅड आदी अन्य प्रकरणात फसवणूक झाल्याचे समोर आले. यामध्ये तब्बल ४५ लाखांनी फसगत केल्याचे पुढे आले. सायबर सेलने ७.६१ लाख रूपयांची रक्कम परत आणण्यात सायबर सेलला यश आले. जानेवारी २०२१ मध्ये सायबर क्राईमचे पाच प्रकरण दाखल झाले. यामध्ये १७ लाख ७४ हजार रूपये लंपास केल्याची माहिती आहे. आतापर्यंत २ लाख रूपयांची रक्कम परत आणण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, तरी देखील सायबर भामट्यांकडून फसवणुकीचे प्रकार सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
 

दाखल तक्रारींचा शंभर टक्के झाला निपटारा
२०२० मध्ये सायबर भामट्यांनी गतवर्षी तब्बल सात लाख ६१ हजार रुपयांनी नागरिकांची फसगत झाल्याची माहिती आहे. या प्रकरणांत पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या नेतृत्वात सायबर सेलद्वारा दोन लाख रूपये परत आणण्यात यश आले तर उर्वरित २४ प्रकरणांचा निपटारा करण्यात यश आले आहे. अत्याधुनिक संसाधनांचा उपयोग करून सायबर सेलमधील पोलिसांनी राजस्थान येथून ओएलक्सवर फसवणूक करणाऱ्या आराेपीस अटक केली. तसेच गुजरात येथून क्रेडीट कार्डद्वारा फसगत करणाऱ्यास तर मुंबई येथील बजाज फायनान्सच्या नावाने फसवणूक करणाऱ्या आरोपीस अटक करीत तक्रारींचा १०० टक्के निपटारा केला.

 

Web Title: Cyber Cell has 11 employees; 97 crimes were uncovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.