शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

मशागत संपली; पावसाची वाट

By admin | Updated: June 9, 2014 23:47 IST

शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतातील मशागत आटोपली असून त्याला आता पावसाच्या सरींची प्रतीक्षा लागली आहे. मृग नक्षत्र प्रारंभ झाले असून येत्या दिवसात केव्हाही पाऊस येण्याची शक्यता बळावली आहे.

वर्धा  : शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतातील मशागत आटोपली असून त्याला आता पावसाच्या सरींची प्रतीक्षा लागली आहे. मृग नक्षत्र प्रारंभ झाले असून येत्या दिवसात केव्हाही पाऊस येण्याची शक्यता बळावली आहे. मान्सून केरळात दाखल झाला आहे. तो महाराष्ट्राच्या वाटेवर आहे. शेतकर्‍यांनी पेरणीकरिता आवश्यक सर्व साहित्याची जुळवाजुळव करणे सुरू केले असून त्यांना आर्थिकतेचा फटका बसत आहे. पारा ४७ अंशावर पोहोचल्याने केवळ बळीराजा नाही तर सर्वानाच मृगाच्या सरींची प्रतीक्षा लागली आहे. गत इखरीप हंगामासोबतच रब्बी                                हंगामही शेतकर्‍यांचा हातचा गेला. या दोन्ही हंगामात निसर्गाने दगा दिल्याने उत्पन्न  झाले नाही. हाता, तोंडाशी आलेला घास  हिरावल्या गेला, तरी निराश न होता सन २0१४-१५ या खरीप हंगामाची  तयारी  जिल्ह्यातील  शेतकर्‍यांनी केली आहे. बँकेच्या कर्जाची थकबाकी असतानाही पैशाची जुळवाजुळव करून बळीराजा  बाजारपेठेत बी- बियाण्यांच्या खरेदीसाठी  पोहोचला. गत वर्षीच्या  तुलनेत या  वर्षी सोयाबीन बियाण्यांच्या किमती दुप्पट झाल्या. मागील वर्षी सोयाबीनची  ३0 किलोची बॅग  १४00 रुपयात  होती. चांगल्या  प्रतिची बॅग १८0५ रुपयांत  मिळत होती. या वर्षी तीच  चांगल्या  प्रतीची बॅग  २६00 रुपयांची झाली तर  सर्वसाधारण कंपनीचे  बियाणे  २१00 रुपयांवर  पोहोचले.सोयाबीनच्या बियाण्यात ७00 ते एक हजार रुपयांची दरवाढ झाली आहे. परिणामी शेतकर्‍यांनी घरगुती सोयाबीन बियाण्याचा वापर करण्याची मानसिक तयारी सुरू केली आहे. कपाशीचे बियाणे मागील  वर्षीच्याच भावात याहीवर्षी  बाजारपेठेत उपलब्ध  आहे. ४५0 ग्रॅम वजनाची  पिशवी ८00 ते ९३0 रुपये या दरात  मिळत आहे. बियाण्यांमध्ये न झालेली वाढ हेच शेतकर्‍याला तात्पुरते समाधान  देते. तुरीच्या बियाण्यात मागील वर्षीच्या  तुलनेत वाढ झाली तशीच  वाढ मूग, उडीद व तीळ बियाण्यातही झालेली आहे. या बियाण्यांची बाजारपेठेतून  खरेदी करण्याऐवजी घरी असलेल्याच बियाण्यांचा वापर शेतकरी करण्याची शक्यता जास्त प्रमाणात जाणवत असल्याचे कृषी साहित्य विक्रेत्यांकडून सांगण्यात येते. अशात कृषी विभागानेही शेतकर्‍यांना घरचे बियाणे वापरण्याचा सल्ला दिला आहे. मात्र ही बियाणे वापरताना त्याची चाचणी करण्याच्या सूचना देखील विभागाने केल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)