बैलबंडीने खांब कोसळल्याने गाईचा मृत्यू

By Admin | Updated: June 21, 2017 00:47 IST2017-06-21T00:47:34+5:302017-06-21T00:47:34+5:30

गावाबाहेरील एका सभागृहासमोरील विद्युत पुरवठा सुरू असलेल्या खांबाला शेतात जाणाऱ्या बैलबंडीची धडक लागली.

Cows died due to collapsing of pedestrians | बैलबंडीने खांब कोसळल्याने गाईचा मृत्यू

बैलबंडीने खांब कोसळल्याने गाईचा मृत्यू

अनर्थ टळला : शेतकऱ्याचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : गावाबाहेरील एका सभागृहासमोरील विद्युत पुरवठा सुरू असलेल्या खांबाला शेतात जाणाऱ्या बैलबंडीची धडक लागली. यामुळे बंडीला मागे बांधून असलेल्या गाईवर विद्युत खांब कोसळला. यात गाईचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी घडली. बंडीचालक शेतकरी व बैलांच्या अंगावर खांब पडला असता तर मोठा अनर्थ झाला असता.
या घटनेमुळे शेतकरी दिलीप झाडे यांचे मोठे नुकसान झाले. बंडीच्या हलक्या धक्क्याने खांक कसा पडला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सदर खांब जमिनीत गाडला होता की नाही, हाही प्रश्नच आहे. या प्रकारामुळे नागरिक संतप्त झालेत. माहिती मिळताच अभियंता व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे गाय ठार झाल्याचे म्हणत शेतकऱ्याने भरपाईची मागणी केली आहे. खांब उभे करण्याचे काम निकृष्ट असल्याने ही घटना घडल्याचा आरोप होत आहे.

Web Title: Cows died due to collapsing of pedestrians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.