शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कोविड लस मंजूर करण्यापूर्वी योग्य चौकशी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 11:51 IST

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड लस मंजूर करण्यापूर्वी योग्य चौकशी करण्याची ग्वाही दिली आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय आरोग्य मंत्रालयची ग्वाही डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी पाठविला होता ५१ पानी अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतीयांसाठी कोविड-१९ वर कोणतीही लस किंवा औषध मंजूर करण्यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेचे औषधी कंपन्यांशी असलेल्या आर्थिक संबंधाची चौकशी करावी, अशी मागणी करीत न्यायवैद्यक तज्ज्ञ डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी जागतिक आरोग्य संघटना व औषध कंपन्या यांच्यातील प्रभावाच्या तपासणीचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच याबाबतचा ५१ पानी अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविला होता. या अहवालाची दखल घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड लस मंजूर करण्यापूर्वी योग्य चौकशी करण्याची ग्वाही दिली आहे.

सन २००९ च्या स्वाईन फ्लू साथीचा अनुभव असे सुचविते की, कोविड विषाणूचा प्रकोप आणि लसीच्या शिफारशींविषयी डब्ल्यूएचओच्या धोरणांवर लस उत्पादकांसह औषध कंपन्यांचा प्रभाव पडण्याची शक्यता योग्य चौकशी केल्याशिवाय नाकारता येत नाही. त्यामुळे भारतीयांसाठी कोविडला कोणतीही लस किंवा औषध मंजूर करण्यापूर्वी डब्ल्यूएचओचे औषधी कंपन्यांशी असलेल्या आर्थिक संबंधांची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. फ्लूविरूद्ध पेटंट औषध आणि लसींना प्रोत्साहन देण्यासाठी औषध कंपन्यांचा डब्ल्यूएचओच्या वैज्ञानिक आणि अधिकृत एजन्सींवर प्रभाव होता. तसेच औषध कपन्यांच्या दबावाखाली डब्ल्यूएचओने अयोग्य व अकार्यक्षम लसीच्या धोरणासाठी आधीच दबावाखाली असलेल्या आरोग्य यंत्रणेची साधने वाया घालविली.

त्यामुळे अनावश्यकपणे कोट्यवधी निरोगी लोकांना अपुरी चाचणी घेतलेल्या लसींच्या अज्ञात दुष्परिणामांच्या जोखमीस सामोरे जावे लागले. या आरोपावरून सन २०१० मध्ये युरोपच्या संसदीय समितीने जागतिक आरोग्य संघटनेविरुद्ध चौकशी केली होती, असे मत न्यायवैद्यक तज्ज्ञ डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी पतंप्रधानांना पाठविलेल्या ५१ पानी अहवालात नमूद केले आहे. या अहवालाची दखल घेत सविस्तर अहवाल पाठवून उपाय सुचविल्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डॉ. खांडेकर यांचे आभार मानले. तसेच लसीच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेऊन व नियमित नियमांचे पालन करुनच सरकारव्दारे लसीला सार्वजनिक वापरासाठी परवानगी दिली जाईल, अशी ग्वाही दिली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस