वर्ध्याकडून नागपूरला येणारा कापसाचा ट्रक पेटला; जिवीतहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 12:58 IST2018-02-27T12:58:46+5:302018-02-27T12:58:53+5:30
सेलू तालुक्यातल्या साईनाथ जिनींग फॅक्टरीमधून कापसाच्या गाठी घेऊन नागपूरकडे निघालेल्या ट्रकला सेलूच्या यशवंत चौकात भीषण आग लागून त्यात कापसाच्या गाठींसह ट्रक जळून गेला.

वर्ध्याकडून नागपूरला येणारा कापसाचा ट्रक पेटला; जिवीतहानी नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: सेलू तालुक्यातल्या साईनाथ जिनींग फॅक्टरीमधून कापसाच्या गाठी घेऊन नागपूरकडे निघालेल्या ट्रकला सेलूच्या यशवंत चौकात भीषण आग लागून त्यात कापसाच्या गाठींसह ट्रक जळून गेला. ही घटना येथे मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली.
सेलू तालुक्यातल्या जुआरी येथे असलेल्या फॅक्टरीमधून कापसाच्या गाठी भरलेला ट्रक निघाल्यानंतर त्याला पाठीमागच्या भागात आग लागल्याचे रस्त्यावरील एका वाहनस्वाराला दिसले. त्याने तात्काळ ट्रकचालकाला त्याची सूचना दिल्यावर चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला. मात्र तोपर्यंत आगीने भीषण रूप धारण केले होते व सर्व गाठी धडाडून जळू लागल्या होत्या. या आगीच्या धगीने ट्रकचे चारही टायर्स फुटले. या घटनेची सूचना अग्निशमन विभागाला देण्यात आली असून, आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या आगीत लाखोंचा कापूस जळून खाक झाला आहे.