शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला योग्य हमीभाव मिळावा

By admin | Updated: November 11, 2014 22:46 IST

जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने दिली. पण आता त्याला हरताळ फासू लागले आहेत. केंद्र सरकारने कापसाला फक्त चार हजार पन्नास हमी भाव जाहीर केला आहे.

वर्धा : जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने दिली. पण आता त्याला हरताळ फासू लागले आहेत. केंद्र सरकारने कापसाला फक्त चार हजार पन्नास हमी भाव जाहीर केला आहे. तो हमी भाव मिळावा म्हणून शासन हमी भावाने पणन व नाफेडच्या मार्फत कापूस खरेदी करत असे. परंतु नव्या सरकारने महाराष्ट्र शासन नाफेड कडून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणार नसल्याने जाहीर केले आहे. त्यामुळे कापसाला सहा हजार हमी भाव जाहीर करावा व शासनाची हमी केंद्रे तत्काळ सुरू करावी अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात मोदी सरकार आणा, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्च व त्यावर पन्नास टक्के जास्त नफा देवून शेती मालाला भाव देऊ, असे जाहीर सांगितले होते. पण आता राज्यात आणि केंद्रातही भाजपचे सरकार असतानाही शेतकऱ्यांच्या कापसाला सहा हजार भाव का दिल्या जात नाही. निवडणुकी पूर्वी दिलेली आश्वासने ही शेतकऱ्यांची फसवणूक करणारी होती व शेतकऱ्यांचे या नेत्यांचे या पूर्वीचे शेतकरी प्रेम बेगडी होते का असा सवाल या निवेदनातून करण्यात आलेला आहे.शेतकरी आज दुष्काळाच्या फेऱ्यात अडकला आहे. शेतीसाठी वीज मिळत नाही. त्यावर कोणी बोलत नाही. हमी भावापेक्षाही कमी तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशेच्या दरम्यान खाजगी व्यापारी कापूस खरेदी करत आहे. हमी भाव टिकावा म्हणून या पूर्वी शासन खाजगी व्यापाऱ्यांच्या जोडीने पणन व नाफेडच्या मार्फत कापूस खरेदी करत होती. पण या नव्या सरकारने मात्र शेतकऱ्यांचा कापूस हमी भावात पणन किंवा नाफेडच्या मार्फत खरेदी केल्या जाणार नाही, असे धोरण जाहीर करून शेतकऱ्यांना चांगलेच तोंडधशी पाडले आहे. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या हवाली करून, त्यांना मनमानी करण्यासाठी रान मोकळे केलेले आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून विदर्भात अशामुळे शेतकरी आत्महत्या सत्र पुन्हा नव्याने सुरू झाल्याचे दिसते. असे असतानाही दरवर्षी कापसाला सहा हजार रूपयांसाठी हमखास आंदोलन करणारे भाजपाचे नेते मात्र कुठे दिसत नाही. आता शेतकऱ्यांनीच आपल्या न्याय्य अधिकारासाठी कापूस भाव आंदोलनात उतरावे, असे आवाहन करण्यात आले. शेतकऱ्यांना सोबत घेऊन, भाजप नेत्यांच्या, आमदार, खासदार मंत्र्यांच्या घरासमोर बँडबाजा वाजवून या अन्यायाचा विरोध करेल असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांना जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्यामार्फत पाठविलेल्या निवेदनातून संघटनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी शिष्टमंडळात समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर देशमुख, जिल्हा संघटक विनय डहाके, अनिरूद्ध गवई, संजय मस्के, सुधीर पांगुळ, मनोहर गायकवाड, संदीप किटे, निळकंठ राऊत, नामदेव गुजरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)