शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

शेती उत्पन्नापेक्षा मजुरीचा खर्च आवाक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 5:00 AM

शेतकऱ्याला शेती कसताना अनेक गोष्टींसाठी पैसे मोजावे लागतात. त्यासाठी त्याला बँक, सावकारांच्या दारात गेल्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांच्या मालाचे भाव घसरले तर शेतकरी शेती करणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज मार्केटमध्ये व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस चार हजार, सोयाबीन तीन हजार, तूर पाच हजार या दराने खरेदी करीत आहे.

ठळक मुद्देशेतकरी विवंचनेत । हमीभावाअभावी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होतेय लूट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागीलवर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकºयांना साधारण उत्पन्न झाले. परंतु, शेतातील पीक हातात येत असताना कोरोनाने शेतकऱ्यांच्या संकटात भर पाडली. खरिप हंगाम तोंडावर आला असताना बि-बियाणे खरेदी, शेतीच्या मशागतीसाठी पैसा शेतकºयांकडे उपलब्ध नाही. शेती उत्पन्नापेक्षा मजुरीचाच खर्च जास्त झाल्याने शेतकरी विवंचनेत सापडले आहेत.बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मिळेल त्या भावात पिकविलेला माल व्यापाºयांना विकत आहे. शेतकऱ्यांच्या या अडचणींचा फायदा घेऊन व्यापारी माल खरेदी करत आहे. पिकविलेल्या मालापेक्षा मजुरांचे वार्षिक उत्पन्न जास्त असल्याने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे.शेतकऱ्याला शेती कसताना अनेक गोष्टींसाठी पैसे मोजावे लागतात. त्यासाठी त्याला बँक, सावकारांच्या दारात गेल्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांच्या मालाचे भाव घसरले तर शेतकरी शेती करणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.आज मार्केटमध्ये व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस चार हजार, सोयाबीन तीन हजार, तूर पाच हजार या दराने खरेदी करीत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या अडचणीत वाढ होत चालली आहे.उत्पन्नापेक्षा खर्च वाढला आहे. सध्या मिळणाऱ्या भावाने शेतकऱ्यांचा लागवड खर्च निघणे अवघड झाले आहे. आधीच शेतकऱ्यांच्या डोक्यावर बँकांचे तसेच सावकाराचे कर्ज आहे. या कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. परंतु, शेतकऱ्यांना शेतीशिवाय पर्याय उरला नाही. शेती करायची म्हटले तर मजुरांची आवश्यकता आहे. त्यासाठी गावात मजूर मिळत नाही. बाहेरून मजूर आणावे लागत आहे. त्यांना येण्याजाण्याचा ऑटो खर्चही द्यावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.लागवडीची सोय नाहीआज तालुक्यात सालगड्याचे साल एक लाख २५ हजार आहे. माणसाची रोजी ३५० रूपये, डवरण २५० रूपये, फवारणी दर ३०० रुपये आहे. त्यामुळे शेती करावी की नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांवर कर्ज असल्याने बँका कर्ज देऊ शकत नाही. पेरणीसाठी पैसा नाही. त्यामुळे पेरणी करायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीवर कुटुंब असल्याने शेती करावी लागते. दुसरा व्यवसाय नाही. संस्था अध्यक्ष, सचिव यांच्याकडे शेतकरी कर्जाची मागणी करीत आहे. थकीत असल्याने कर्जही देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही लागवडीची सोय करता आली नाही.एकरी २६ हजारांचा खर्चनांगरणी खर्च दीड हजार रुपये, वखरणी २०० रूपये, रोटावेटर १ हजार २०० रूपये, पेरणी ४०० रूपये, शेणखत ६ हजार रुपये, रासायनिक खत पाच हजार, औषधी ६ हजार, वेचणी ६ हजार, थ्रेशर १ हजार, हमाली व माल घरी येईपर्यंत १ हजार ५०० रुपये तसेच रासायनिक खतांचा खर्च असा एकूण २६ हजार रुपये खर्च येत आहे. हा खर्च करताना शेतकऱ्यांना आर्थिक कसरत करावी लागत आहे. त्यातच मजुर मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती