कंत्राटदार काम देण्यासाठी आला आणि मजुराच्या पत्नीसोबत दुचाकी घेऊन पळाला; कळंब येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 18:32 IST2025-11-15T18:32:19+5:302025-11-15T18:32:55+5:30
Wardha : लातूरच्या कंत्राटदाराने शरद परिसरातील एका ऊसतोड मजुराच्या जबाबदारीवर २० जोडपे मजूर देण्याचा करार केला. कंत्राटदाराने यासाठी नऊ लाख रुपये मजुरांना इसार म्हणूनही दिले.

Contractor came to provide work and fled with the laborer's wife on a two-wheeler; incident in Kalamb
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : लातूर येथील एका ऊसतोड कंत्राटदाराने शरद व परिसरातील मजुरांसोबत ऊसतोडीचा करार केला. मजूर दुसरीकडे कामाला गेल्याच्या रागातून कंत्राटदाराने चक्क एका मजुराच्या पत्नीलाच रात्री दोन वाजता पळवून नेले. सोबतच त्याची दुचाकीही नेली. ही घटना चार दिवसांपूर्वीची असून शुक्रवारी त्या महिलेचा पती व आईने कळंब पोलिसात तक्रार दिली.
लातूरच्या कंत्राटदाराने शरद परिसरातील एका ऊसतोड मजुराच्या जबाबदारीवर २० जोडपे मजूर देण्याचा करार केला. कंत्राटदाराने यासाठी नऊ लाख रुपये मजुरांना इसार म्हणूनही दिले. सर्व मजुरांना दसऱ्याला घेऊन जाण्याचे ठरले. त्याचवेळी उर्वरित सहा लाख रुपये देण्याची बोलीही करण्यात आली. कंत्राटदार दसरा गेला, दिवाळी गेली तरी मजूर घेण्यासाठी आला नाही. त्यामुळे सर्व मजूर दुसरीकडे कामाला गेले. कंत्राटदार एका महिलेला सोबत घेऊन शरद गावात आला. त्याने ज्याच्या जबाबदारीवर मजुरांसोबत करार केला होता, त्याचे घर गाठले. त्याच्याकडे दोन दिवस मुक्कामी राहून मजुरांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला. परंतु नोटरी केलेले मजूर दुसरीकडे कामाला गेल्याचे त्याच्या लक्षात आले.
"तक्रार घेऊन संबंधित महिलेचे नातेवाईक पोलिस ठाण्यात आले होते. महिला व ऊसतोड कंत्राटदाराशी संपर्क करण्यात येत आहे. प्रकरणाची सत्यता तपासून योग्य ती कारवाई केली जाईल. "
- राजेश राठोड, ठाणेदार कळंब