लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्हा कंत्राटदार कल्याण समितीच्या नेतृत्त्वात कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. सदर आंदोलन थकीत देयक तात्काळ अदा करण्यासह विविध मागण्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आंदोलनकर्त्या कंत्राटदारांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.विविध योजनेंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामांचे थकीत असलेले ३५.४० कोटी तात्काळ अदा करण्यात यावे. क्रेशर सॅँड लहान कंत्राटदारांना वापरण्यास मनाई असून फक्त मोठ्या कामासाठी त्याची परवानगी देण्यात यावी. जिल्ह्यातील रेतीघाट सुरू नसल्याने कंत्राटदाराची कामे थप्प आहेत. रेतीघाटाचे लिलाव लवकरात लवकर करण्यात यावे. डांबरीकरणच्या एस.एस. आर. रेट मध्ये फार तफावत आहे असून ५० लाखपर्यंत कामाच्या रॉयल्टी पासेस आॅफीसमध्ये जमा करण्यात याव्यात. आदीवासी व महसूल विभागाच्या कामाची रक्कम डिपॉझीट जमा झाल्या शिवाय निविदा काढू नये. १ कोटीपर्यंत कामावर अटी व शर्ती टाकू नये. लहान कामाचे क्लम्बींग करण्यात येवू नये. कररानाम्याच्या अनुसार कंत्राटदारांना मासीक देयके देण्यात यावे. इन्शुरन्सचे कार्यालय नागपूरमध्ये देण्यात यावे. मुदतवाढ पर्यंत (इन्शुरन्स) लागु करण्यात यावा. सा.बां.वि.च्या कंत्राटदारांना रेतीघाट देण्यात यावे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहे. आंदोलनात किशोर मिटकरी, एस.बी. सिंग, झाडे, थोरात, वानखेडे, व्यास, ऐकापूरे, हेमंत नरहरशेट्टीवार आदी सहभागी झाले आहेत.
कंत्राटदारांचे साखळी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:11 IST
वर्धा जिल्हा कंत्राटदार कल्याण समितीच्या नेतृत्त्वात कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. सदर आंदोलन थकीत देयक तात्काळ अदा करण्यासह विविध मागण्यांसाठी सुरू करण्यात आले आहे.
कंत्राटदारांचे साखळी उपोषण
ठळक मुद्देथकीत देयके अदा करण्याची मागणी