कंटेनरची दुचाकीला जबर धडक; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 06:00 IST2019-10-25T06:00:00+5:302019-10-25T06:00:07+5:30
कंटेनरच्या चाकात धोंगडी सराम आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात होताच कंटेनर चालकाने घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. शिवाय पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. सदर अपघाताची नोंद सेलू पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सेलू पोलीस करीत आहेत.

कंटेनरची दुचाकीला जबर धडक; एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : येथील विकास चौक भागात बायपास जवळ भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. अपघात होताच आरोपी कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची नोंद सेलू पोलिसांनी घेतली आहे. धोंगडी पांडुरंग सराम, असे मृतकाचे नाव असल्याचे सांगण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, धोंगडी सराम हे वडगाव जंगली येथील माजी सरपंच आहेत. ते नेहमीच नागरिकांचे विविध प्रकारची कामे घेऊन सेलू येथील तहसील कार्यालयात येत होते. गुरूवारी ते नेहमी प्रमाणे वडगाव जंगली येथून एम. एच. ३२ ए.ए. २४३१ क्रमांकाच्या दुचाकीने सेलू येथील तहसील कार्यालयात जात होते. दुचाकी विकास चौका नजीकच्या बायपास परिसरात आली असता भरधाव असलेल्या एम.एच. ०४ एफ.यू १७२२ क्रमांकाच्या भरधाव कंटेनरने त्यांना जबर धडक दिली.
यात कंटेनरच्या चाकात धोंगडी सराम आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात होताच कंटेनर चालकाने घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. शिवाय पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. सदर अपघाताची नोंद सेलू पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सेलू पोलीस करीत आहेत. या भागातून सध्या जड वाहने सुसाट पळविली जात आहे. शिवाय त्याकडे दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार असलेल्या पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.