शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
4
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
6
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
7
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
8
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
9
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
10
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
11
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
12
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
13
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
14
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
15
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
16
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
17
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
18
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
19
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
20
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."

सिलिंडर अनुदानाबाबत ग्राहकांत संभ्रम

By admin | Updated: December 13, 2014 02:07 IST

गॅस ग्राहकांना सिलिंडरवर मिळणारे अनुदान पुन्हा एकदा बॅँकेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

दारोडा : गॅस ग्राहकांना सिलिंडरवर मिळणारे अनुदान पुन्हा एकदा बॅँकेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यापूर्वी अनेक ग्राहकांना या अनुदानाची रक्कम मिळविताना चांगलाच मनस्ताप झाला़ काही ग्राहकांची अनुदानाची रक्कम कुठे गेली, याचा थांगपत्ता लागला नाही. यामुळे अनेक गॅस धारकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना बॅँकेत हेलपाटे मारणे परवडणारे नाही़ यामुळे अनुदान मिळविण्याकरिता हा खटाटोप कशाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ सर्वसामान्य शेतकरी व शेतमजूर यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. घर चालविण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यंदाचे साल शेतीला पूरक नसल्याने कुटुंब प्रमुखाला पेच पडला आहे. मध्यंतरी ही योजना बंद झाल्याने सुटका झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत होती. यापुढे ग्राहकांना सिलिंडर घेताना आता जादा रकमेची जुळवाजुळव करावी लागणार आहे. यानंतर आपले पैसे आपल्यालाच मिळविण्यासाठी तासन्तास बॅँकेत रांगा लावून प्रतीक्षा करावी लागते. ज्या गावात बॅँकच नसेल, त्या शेतकऱ्याला, शेतमजुराला २०० ते ३०० रुपये मजुरी पाडून अनुदानासाठी थांबावे लागते़ यामुळे घडाईपेक्षा मडाईच अधिक, अशा प्रतिक्रियाही उमटत आहे. सरकार बदलले खरे; पण त्याच त्रासदायक योजना कायम राहत असेल तर परिवर्तनाचा उपयोग काय, असा सवाल सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत़ या संपूर्ण संभ्रमावस्थेमुळे नागरिक त्रस्त असून योजना रद्द करण्याची मागणी होत आहे़(वार्ताहर)