काँग्रेस-भाजपचे पदयात्रेतून बापूंना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST2019-10-03T06:00:00+5:302019-10-03T06:00:17+5:30

शांतीचा संदेश देणाऱ्या या पदयात्रेत काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन राऊत, सचिन सावंत, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, शेखर शेंडे, प्रविण हिवरे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस व सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. महात्मा गांधी यांचे विचार आजही सार्थक आहेत.

Congress-BJP greetings to Bapu | काँग्रेस-भाजपचे पदयात्रेतून बापूंना अभिवादन

काँग्रेस-भाजपचे पदयात्रेतून बापूंना अभिवादन

ठळक मुद्देदोन्ही पक्षांचे नेते सेवाग्रामात झाले नतमस्तक : पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादपदयात्रेतून काँग्रेसची राष्ट्रपित्याला श्रद्धांजली

वर्धा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश सेवादलाच्यावतीने गांधी जयंतीचे औचित्य साधून सेवाग्राम आश्रम ते हुतात्मा स्मारक अशी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेच्या माध्यमातून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शांतीचा संदेश देत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना मानवंदना अर्पण केली.
शांतीचा संदेश देणाऱ्या या पदयात्रेत काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन राऊत, सचिन सावंत, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, शेखर शेंडे, प्रविण हिवरे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस व सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. महात्मा गांधी यांचे विचार आजही सार्थक आहेत. येथील पदयात्रेत नेते मंडळी सहभागी नाही असे नाही. अनेक नेते निवडणुकीच्या अनुषंगाने आपआपल्या मतदार संघात आहेत. शिवाय ते तेथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महात्मा गांधी यांना अभिवादन करीत असल्याचे यावेळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. गांधी विचार आजही जगाला पे्ररणा देणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

Web Title: Congress-BJP greetings to Bapu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.