शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

या...याच खड्ड्यात येऊन साठवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वर्धेकराच्या भविष्यकालीन सोयीच्या दृष्टीने लोकाभिमूख अमृत योजने अंतर्गत भूमीगत मलनिस्सारण योजचेने काम गेल्या दीड ...

ठळक मुद्देकंत्राटदाराचा निष्काळणीपणा : कारवाईच्या केवळ बाताच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धेकराच्या भविष्यकालीन सोयीच्या दृष्टीने लोकाभिमूख अमृत योजने अंतर्गत भूमीगत मलनिस्सारण योजचेने काम गेल्या दीड वर्षांपासून सुरु करण्यात आले आहे. परंतु, कंत्राटदाराची मनमर्जी आणि पालिकेची हतबलता यामुळे शहरातील रस्त्याच्या मध्यभागांत खोदण्यात आलेले खड्डे वर्धेकरांसह इतरांनाही ‘या...याच खड्डयात येऊन साठवा’ असे खुणावत आहे. कठोर कारवाई अभावी कंत्राटदाराकडून निष्काळजीपणाचा कळस गाठला जात असल्याने ही योजना आता ‘धोकाभिमुख’ ठरत आहे.शहरात गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून ८७ कोटींच्या मलनिस्सारण योजनेचे काम सुरु आहे. या योजनेचा कंत्राट पी. एल. अडके नामक कंपनीला दिला आहे. या कंपनीने सुरुवातीपासून नियोजन शुन्य काम सुरु केले. मलनिस्सारण योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागात खोदकाम करुन ठेवले. त्यासोबत चेंबरसाठी गोल खड्डेही खोदले होते. शहरातील नागरिकांना या कामाचा मोठा त्रास सहन करावा लागला. यामुळे शहरातील मजबूत व गुळगुळीत रस्ते खड्डेमय झाले आहे. यासोबतच काम करताना कोणतेही सूचना फलक लावलेले नसल्याने अनेक जण खड्डयात पडले. एका बालकाला कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे जिवही गमवावा लागला. घटनेनंतर वारंवार वादंग उठले, तक्रारीचा ओख वाढला पण; कंत्राटदाराविरुद्ध ठोस कार्यवाही झाली नसल्याने वर्धेकरांचे दुखने कायमच राहिले आहे. आताही बजाज चौक हा शहराचा मुख्य भाग आहे. या ठिकणचे काम गतीने करणे अपेक्षीत आहे. तरीही धिम्यागतीने काम करीत अडचणी उभा करुन ठेवल्या आहे. बसस्थानकासमोर एका बाजुने खोदकाम करण्यात आल्याने एकाच बाजुने वाहतूक वळविताना वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे. बसस्थानकासमोर मध्यभागी चेंबरसाठी मोठा खड्डा खोदून ठेवला. अनेक दिवसांपासून हा खड्डा तसाच आहे. शिवाय सूचना फलक खड्ड्यात पडल्याने यामार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पालिका व एमजीपीने विषयाचा बनविला चेंडूच्अमृत योजनेंतर्गत सुरु असलेल्या मलनिस्सार योजनेच्या अनेक तक्रारी झाल्या. प्रत्येक प्रभागातील नागरिकांनी या ढिसाळ कामाविरुद्ध आवाज उठवून नगरपालिकेसह लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे तक्रारी केल्या. त्यामुळे हा विषय मंत्रालयापर्यंत जाऊन पोहोचला. या विषयांसर्भात नोव्हेंबर महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या सचिवांच्या उपस्थितीत न.प. प्रशासन, मजिप्रा विभाग व कंत्राटदाराची बैठक झाली. यावेळी कंत्राटदारावर दंड ठोठावला व काळ्यायादी टाकण्याच्या सूचना दिल्या. मात्र, कंत्राटदारावर कारवाई झाली नाही. याबाबत पालिकेला आणि मजिप्रा एकमेकांकडे बोट दाखवून टोलवाटोलवीच करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.कंत्राटदाराने घेतला निर्णयाचा आधारमंत्रालयात झालेल्या बैठकीत कंत्राटदाराला दंड ठोठावून काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. पण, या निर्णयाविरुद्ध कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेत लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून काम करण्याच अडचणी निर्माण केल्या जात आहे. वारंवार काम बंद पाडल्या जात असल्याने काम करणे कठीण झाल्याने न्यायालयात सांगितल्याने त्या निर्णयाला स्थगिती दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे कंत्राटदाराने न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत आपली मनमर्जी कायमच ठेवली आहे.मात्र, याचा जीवघेणा त्रास वर्धेकरांसह शहरातील मार्गाने अवागमण करणाऱ्या प्रत्येकास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा