शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री शेतकऱ्यांना भेटत नाहीत, सुप्रिया सुळेंच्या फेसबुकवरुन 'तो' व्हिडिओ डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 15:03 IST

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकालात होत नाही, तोपर्यंत कुठल्याही निवडणुका होऊ नयेत. आपलं सरकार असतानाही वर्धा जिल्हा दुष्काळग्रस्त होऊ शकला नाही. जोपर्यंत कोरोनाचा नायनाट होत नाही, सध्या डेंग्यूनं थैमान घातलं आहे.

ठळक मुद्देसुप्रियाताई मी एक प्रश्न विचारतो, तुम्ही औरंगाबादच्या सभेत म्हटला होतात. माझ्या बापाने रक्ताचं पाणी केलं म्हणून राष्ट्रवादी आज जिवंत आहे. हे जर खरं असेल तर राष्ट्रवादी कुठे चाललीय याचा विचार करायला हवा

वर्धा - राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे, तिन्ही पक्ष एकमेकांच्या हातात हात घालून चालतात. मात्र, अनेकदा स्थानिक पदाधिकाऱ्यांना एकमेकांचे पाय ओढावे लागतात. त्यातून, जुळवून घ्यावे लागते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धा येथील जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार राजू तिमांडे यांनी थेट मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे शेतकऱ्याला भेटत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकालात होत नाही, तोपर्यंत कुठल्याही निवडणुका होऊ नयेत. आपलं सरकार असतानाही वर्धा जिल्हा दुष्काळग्रस्त होऊ शकला नाही. जोपर्यंत कोरोनाचा नायनाट होत नाही, सध्या डेंग्यूनं थैमान घातलं आहे. त्यामुळे, सध्या कुठलाही राष्ट्रवादीचा कार्यक्रम वर्ध्यात घेऊ नका. शरद पवार यांनाही दिवाळीनंतरच इकडे पाठवा, असे वर्ध्यातील कार्यकारिणीच्या सभेत हिंगणाघाटचे माजी आमदार राजू तिमांडे यांनी म्हटले. राजू तिमांडे यांनी उद्गविग्नपणे आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. 

सुप्रियाताई मी एक प्रश्न विचारतो, तुम्ही औरंगाबादच्या सभेत म्हटला होतात. माझ्या बापाने रक्ताचं पाणी केलं म्हणून राष्ट्रवादी आज जिवंत आहे. हे जर खरं असेल तर राष्ट्रवादी कुठे चाललीय याचा विचार करायला हवा. केवळ शरद पवार यांच्यामुळेच महाराष्ट्रात संघटन आहे. आज महाराष्ट्रात आघाडीचं सरकार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे मंत्री मंत्रालयात बसतात. पण, मुख्यमंत्री बांधावरच्या शेतकऱ्यांना भेटू शकत नाहीत, ही शोकांतिका आहे. शरद पवार हे शेतकऱ्यांना भेटायचे, हा मुख्यमंत्री कुणाला भेटत नाही, असे म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेंसमोरच मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन या सभेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येत होते. मात्र, त्यावेळी व्हिडिओत तिमांडे यांचे भाषणही कैद झाले. मात्र, काही वेळातच हा व्हिडिओ सुप्रिया सुळेंच्या फेसबुक अकाऊंटवरुन डिलीट करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांवर स्थानिक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने हल्लाबोल केल्यानेच हा व्हिडिओ हटविण्यात आला असल्याचे दिसून येते.   

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरी