शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

ढगाळ वातावरणाने हरभरा, तुरीवर संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 11:42 PM

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सध्या तुरीचे पीक बहरले असून, हरभराही चांगल्या स्थितीत आहे. मात्र, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण ...

ठळक मुद्देअळ्या पडण्याची भीती : फवारणीमुळे खर्चात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या तुरीचे पीक बहरले असून, हरभराही चांगल्या स्थितीत आहे. मात्र, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने या पिकांवर रोग पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.ढगाळ वातावरणाने तूर व हरभरा पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. तसेच फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढणार असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. खरिपातील संकटातून सावरत नाही तोच नवे संकट शेतकºयापुढे उभे ठाकले आहे.सद्यस्थितीत पाने कुरतडणाºया अळीचा तूर पिकावर प्रादुर्भाव झाला असून, धुक्यामुळे फुलांची गळती होत असल्याने शेतकरी चिंतित आहेत. दोन दिवसांआड वातावरणात बदल होत असल्याने तुरीचे पीक संकटात आले आहे. ढगाळ वातावरण व धुक्यामुळे फुल गळती, पाने कुरतडणारे कीटक वाढले आहेत. तसेच अचानक हवामान बदलून ढगाळ वातावरणामुळे सध्या बहरात आलेली तूर हातची जाण्याची शक्यता आहे.अनेक ठिकाणी फुलांची मोठ्या प्रमाणात गळती होण्यास प्रारंभ झाला आहे. तसेच अळ्यांचा प्रादुर्भाव होण्यासही सुरुवात झाली आहे. सध्या शेतकरी कापूस वेचणीच्या कामात व्यस्त असल्यामुळे तुरीकडे त्याचे लक्ष नसले तरी तुरीची पाहणी करून अळ्यांचा प्रादुर्भाव धोक्याची पातळी ओलांडणारा नाही ना, याची खात्री करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.जर अळ्यांची पातळी धोकादायक असेल, तर कृषी विभागाच्यावतीने यासाठी फवारण्या करण्याचा सल्ला शेतकºयांना देण्यात येत आहे.या करा उपाययोजनासध्या तुरीचे पीक फुल व कळी येण्याच्या अवस्थेत आहे. येणाºया काळात शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी क्लोरोपायरिफॉस १५ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ५0 टक्के फुले व शेंगा असताना क्विनॉलफॉस २0 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दाणे भरताना शेंगा पोखरणाºया अळीसोबत शेंगमाशीचा प्रादुर्भाव वाढल्यास इमामेक्टिन बॅझायेट चार ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.शेतकºयांनी वातावरणातील बदल लक्षात घेता योग्य त्या उपाययोजना कराव्या, तसेच कृषी विभागाच्या अधिकाºयांचा सल्ला घेऊन फवारणी करावी. आगामी काळात अळ्यांचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यामुळे आतापासूनच दक्षता घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :weatherहवामानagricultureशेती