अट्टल चोरटा ‘लल्या’ लागला शहर पोलिसांच्या गळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 06:00 AM2019-11-14T06:00:00+5:302019-11-14T06:00:16+5:30

समतानगर सावंगी (मेघे) येथील अशोक ओंकार हे त्यांच्या कुटुंबियांसह मोठ्या मुलीकडे जावायांना भेटण्यासाठी चंद्रपूर येथे गेले होते. याच कालावधीत कुलूपबंद घराला टार्गेट करून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील रोख १७ हजार आणि २४ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार ओंकार यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.

The city police arrest "Lalya" thief | अट्टल चोरटा ‘लल्या’ लागला शहर पोलिसांच्या गळाला

अट्टल चोरटा ‘लल्या’ लागला शहर पोलिसांच्या गळाला

Next
ठळक मुद्देचोरीचा मुद्देमाल जप्त : तीन ठिकाणी चोरी केल्याची दिली कबुली

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : घरफोड्या करण्यात तरबेज असलेल्या अनिकेत उर्फ लल्या विनोद बोंबले (१९) रा. भिमनगर वॉर्ड, सावंगी (मेघे) याला अटक करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. एका चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाला गती देत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने दोन चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल शहर पोलिसांनी जप्त केला आहे.
समतानगर सावंगी (मेघे) येथील अशोक ओंकार हे त्यांच्या कुटुंबियांसह मोठ्या मुलीकडे जावायांना भेटण्यासाठी चंद्रपूर येथे गेले होते. याच कालावधीत कुलूपबंद घराला टार्गेट करून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील रोख १७ हजार आणि २४ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार ओंकार यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. तसेच आरती प्रल्हाद भोयर (३९) रा. श्रीवास्तव अपार्टमेंट, समतानगर, वर्धा या कर्तव्यावर गेल्या असता त्यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून घरातील साहित्य अस्ताव्यस्त करीत चोरीचा प्रयत्न केल्याची तक्रार आरती भोयर यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. या दोन्ही तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेत शहर पोलिसांनी तपास सुरू केला असता खात्रीदायक माहितीच्या आधारे अनिकेत उर्फ लल्या विनोद बोंबले याजा पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवाय पोलिसी हिसका देत विचारपूस केली असता त्याने सदर दोन्ही गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय त्याने सावंगी भागातील भगत यांच्या घरीही चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याच्याकडून पोलिसांनी २४ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, ५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे कानातले, १ सोन्याची बाही व रोख २ हजार ५०० रुपये असा एकूण ३७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशनचे बाबाराव बोरकुटे, संजय पंचभाई, मंगेश झामरे, महादेव सानप, सचिन देवतळे, गितेश देवघरे, विकास मुंडे, विजय काळे, निखिल वासेकर यांनी केली.

Web Title: The city police arrest "Lalya" thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर