शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

लसींचा ठणठणाट; केंद्रांना लागले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 05:00 IST

लससाठा कमी होताना दिसताच लसीकरण केंद्रेही कमी करण्यात आली. २९ तारखेपर्यंत १८ केंद्रांवरून लसीकरण करण्यात आले; मात्र, १ जुलैला केवळ पाचच केंद्रे सुरू होती. इतर सर्व केंद्रांना टाळे लागले असून, पुढील आदेशापर्यंत लसीकरण बंद राहणार असल्याचे सूचना फलक लावण्यात आले आहेत. मागणीनंतरही लस उपलब्ध न झाल्याने शुक्रवारपासून सर्व लसीकरण केंद्रे कुलूपबंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाच केंद्रांवर लसीकरण : शुक्रवारपासून होणार बोंबाबोंब! कसे साधणार लक्ष्य?

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात  प्रथम शतप्रतिशत लसीकरण करणाऱ्या तीन ग्रामपंचायतींना पाच लाखांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा खुद्द पालकमंत्र्यांनी केली आहे. पण, लसीकरणाचा वेग वाढायला लागताच लससाठा संपत असल्याचा अनुभव वर्धेकरांना येत आहे. आताही लससाठा संपल्याने केंद्रांना टाळे लागले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर लसीकरणाचे लक्ष्य कसे साध्य होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला प्रारंभ झाला असून लसीकरणाची गती वाढावी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती करण्यासोबतच पारितोषिक योजनाही अंमलात आणली आहे. ग्रामपंचायतीही पुढाकार घेऊन नागरिकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. त्यामुळे लस घेणाऱ्यांची संख्या वाढताना दिसल्याने जिल्ह्यात १८० लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रांतही लस देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यासोबतच गावागावांमध्ये शिबिरे घेऊन लसीकरण केले जात आहे. परंतु शासनाकडून लस पुरवठा होत नसल्याने यंत्रणेला अडचणींचा सामना करावा लागत आहे. आत. १८ वर्षांवरील  लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढायला लागली. सकाळपासूनच लांबलचक रांगा दिसू लागल्या आहेत. त्यामुळे जवळपास ४७ केंद्रांवरून लसीकरण सुरू होते. लससाठा कमी होताना दिसताच लसीकरण केंद्रेही कमी करण्यात आली. २९ तारखेपर्यंत १८ केंद्रांवरून लसीकरण करण्यात आले; मात्र, १ जुलैला केवळ पाचच केंद्रे सुरू होती. इतर सर्व केंद्रांना टाळे लागले असून, पुढील आदेशापर्यंत लसीकरण बंद राहणार असल्याचे सूचना फलक लावण्यात आले आहेत. मागणीनंतरही लस उपलब्ध न झाल्याने शुक्रवारपासून सर्व लसीकरण केंद्रे कुलूपबंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

केंद्र सरकारकडून राज्य सरकार आणि राज्य सरकारकडून जिल्ह्याला लसींचा पुरवठा होतो. त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थी संख्येचा विचार करून लससाठ्याची मागणी करण्यात आली आहे. अद्यापही लस उपलब्ध न झाल्याने गुरुवारी केवळ पाच केंद्रांवर लसीकरण सुरू होते. लस उपलब्ध न झाल्यास शुक्रवारपासून ही केंद्रेही बंद करावी लागतील.- डॉ. प्रभाकर नाईक, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस