शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने बालमजुराचा मृत्यू, लाडकी शिवारातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 06:05 IST

Wardha News: रस्त्याचे मोजमाप करताना मोजमाप पट्टीचा विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने एका १७ वर्षीय बालमजुराचा  जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ९.३० मिनिटाच्या सुमारास लाडकी शिवारात घडली. रोहित विलास मोहिते रा. नागरी असे मृत बालकाचे नाव आहे.

हिंगणघाट (वर्धा) -  रस्त्याचे मोजमाप करताना मोजमाप पट्टीचा विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने एका १७ वर्षीय बालमजुराचा  जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ९.३० मिनिटाच्या सुमारास लाडकी शिवारात घडली. रोहित विलास मोहिते रा. नागरी असे मृत बालकाचे नाव आहे.

सविस्तर वॄत्त असे की, हिंगणघाट- नागरी रस्त्यावर लाडकी शिवारात रेल्वे पुलाचे व रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या कामावर हा बालक कामाला होता. मोजमाप करताना नकळत त्याच्या हातातील लोखंडी मोजमाप पट्टीचा स्पर्श विद्युत वाहून नेणाऱ्या तारांना झाला. या स्पर्शामुळे युवक गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले.या घटनेनंतर नागरी गावात शोककळा पसरली. मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी ,अशी मागणी केली. मागणी पूर्ण होईपर्यंत मृतक बालकाचे पार्थिव न नेण्याचा इशारा संतप्त गावकऱ्यांनी दिला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतक बालकाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र संबंधित कंत्राटदाराकडून कोणतेही आश्वासन न मिळाल्याने हा तणाव वाढतच गेला. घटनेनंतर दंगल नियंत्रण पथक आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार आणि ठाणेदार मारोती मुळुक यांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. मध्यस्ती करुन तणाव शांत केला. या रस्ताचे बांधकाम सुरू असतांना कंत्राट कंपनीकडून सुरक्षतेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाही. तसेच कामगाराचा विमा सुद्धा नसल्याचा आरोप नागरी येथील गावकऱ्यांनी केलेला आहे. याबाबत मृतकाचे नातेवाईकाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस तपास सुरु आहे. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रDeathमृत्यूAccidentअपघात