शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

छत्रपती शिवरायांचे राज्य हे खरे लोक कल्याणकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 6:00 AM

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात कुठलाही जाती अथवा धर्मभेद न जोपासता गुण आणि कर्तृत्वावर प्रजेतील सर्वांना समान संधी दिली. सर्वच रयतेला पोटच्या पोराप्रमाणे जपले, म्हणूनच छत्रपती शिवरायांचे राज्य हे खरे लोक कल्याणकारी राज्य होते, असे मत प्रसिद्ध वक्ते प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केले. मराठा सेवा संघाद्वारे आयोजित शिवजयंती महोत्सवात ते बोलत होते.

ठळक मुद्देप्रवीण देशमुख : शिवजयंतीनिमित्त व्याख्यानमाला; वर्धेकरांची मोठी उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात कुठलाही जाती अथवा धर्मभेद न जोपासता गुण आणि कर्तृत्वावर प्रजेतील सर्वांना समान संधी दिली. सर्वच रयतेला पोटच्या पोराप्रमाणे जपले, म्हणूनच छत्रपती शिवरायांचे राज्य हे खरे लोक कल्याणकारी राज्य होते, असे मत प्रसिद्ध वक्ते प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केले. मराठा सेवा संघाद्वारे आयोजित शिवजयंती महोत्सवात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष ओंकार धावडे, कार्यकारी अभियंता रवींद्र वºहाडे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ वानखेडे, सहाय्यक कार्यकारी अभियंता संदीप हासे, उपविभागीय अभियंता संजय मंत्री, सहाय्यक अभियंता संजय मानकर, पोलीस निरीक्षक धनाजी जळक, मोहन वडतकर, कोटंब्याच्या सरपंच रेणुका कोटंबकार, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष योगिता इंगळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मंगेश विधळे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष नीरज बुटे, विधी व न्याय परिषदेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. कपिल गोडघाटे उपस्थित होते. वैष्णवी भोयर, रिंकू भोयर यांनी गायलेल्या जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.प्रा. देशमुख म्हणाले, युद्धप्रसंगी कुराण, बायबल अथवा कुठलाही धर्मग्रंथ सापडल्यास सन्मानपूर्वक जतन करण्याचे महाराजांचे आदेश होते. मात्र, आज देशात महाराजांच्या सहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध काम सुरू असून धर्म आणि जातीत फूट पाडण्याचे काम सुरू आहे. शिवराय हे पर स्त्रीला मातेसमान मानत असत, याचा संदर्भ संत तुकाराम महाराजांच्या अभंगात असल्याचे त्यांनी सांगितले.प्रारंभी विश्व हिंदी विद्यापीठाचे जीवन कोडापे, प्रकाश वानखेडे, भूषण तुरणकर यांनी महाराजांच्या जीवनकार्यावर पोवाडा सादर केला. तर ‘शिवरायांची शौर्यगाथा’ ही नाटिका लखोटिया भुतडा विद्यालय कोंढाळीच्या विद्यार्थ्यांनी सादर केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर गिºहे तर संचालन अनिता येवले व अनिकेत जाधव यांनी केले. आभार किशोर जगताप यांनी मानले. कार्यक्रमास मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला वर्धेकर नागरिकांची मोठी उपस्थिती उपस्थिती होती. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज