शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीचे सभापतिपद खुल्या प्रवर्गाकडे

By admin | Updated: July 22, 2014 00:01 IST

नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षण धोरणानुसार कारंजा पंचायत समिती सभापतीचे पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षीत करण्यात आले आहे़ यामुळे भाजपा व काँगे्रसने सभापतीपद आपल्याकडे

मोर्चेबांधणीला वेग : निवडणुकीकडे सर्वांचे लक्षकारंजा (घा़) : नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षण धोरणानुसार कारंजा पंचायत समिती सभापतीचे पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षीत करण्यात आले आहे़ यामुळे भाजपा व काँगे्रसने सभापतीपद आपल्याकडे ठेवण्याकरिता राजकीय मोर्चेबांधणीला वेग दिल्याचे दिसते़ सध्या भाजपाचे मोरेश्वर भांगे विद्यमान सभापती आहेत़ हे सभापती पद आपल्या पक्षाकडे कायम ठेवण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत़ याच पक्षाच्या उपसभापती प्रेमीला चौधरी यांचे सदस्यपद ग्रा़पं़ चा कर न भरल्याने रद्द झाले़ राजकीय परिस्थिती बरीच बदलली असून पक्षबल कमी झाले आहे़ भाजपा सभापतीपद आपल्याकडे राखू शकेल वा नाही, हा प्रश्नच आहे़ यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रसच्या एकमेव सदस्य शुभांगी पठाडे यांची मदत घ्यावी लागणार आहे; पण त्या स्वत: सभापती पदासाठी इच्छुक असल्याने त्या बिनशर्त पाठिंबा कशा देतील, हाही प्रश्नच आहे़ राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची वरच्या पातळीवर युती असल्याने युतीच्या विरोधात मतदान करण्यासाठी त्यांना परवानगी कशी मिळणार, हे ही एक कोडेच आहे़सध्या पं़स़चे पक्षबल पाहता भाजपकडे ४, काँगे्रसकडे ४ तर राष्ट्रवादीकडे १ सदस्य आहे़ भाजपचा एक सदस्य निलंबित झाला आहे़ काँग्रेसला आपल्या पक्षाचा सभापती बनवायचा असेल तर राष्ट्रवादीच्या सदस्याची मदत घेणे वा भाजपमधून एखादा नाराज सदस्य ओढणे आवश्यक आहे; पण मोदी-लाटमध्ये भाजपाचा सदस्य ओढणे कठीण आहे़ तालुक्यात भोयर-पवार समाज अधिक असल्याने कोणत्याही पक्षाचा होवो; पण भोयर-पवार समाजाचा सभापती व्हावा, अशी समाजाची इच्छा आहे़ भाजपकडे भोयर-पवार समाजाचा एकही पं़स़ सदस्य नाही़ काँग्रेसकडे मात्र दोन सदस्य आहेत़ भाजप व काँगे्रसकडे चार-चार असे सारखे संख्याबळ असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य या संधीचा फायदा घेत सभापती पद प्राप्त करतील, ही शक्यता नाकारता येत नाही़ त्या भोयर-पवार समाजाच्या असून खुल्या प्रवर्गाच्या दावेदार आहेत़ एकंदरीत राजकीय स्थिती दोलायतमान असून वेळेवर कोण व कशी बाजी मारेल, हे सांगता येत नाही़ दोन्ही पक्षांचे नेते पोटतिडकेने प्रयत्न करताहेत़ विधानसभा निवडणुकीमुळे सभापती पदाच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे़(तालुका प्रतिनिधी)