बापूंच्या आश्रमावर राहणार सीसीटीव्हीची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:00:24+5:30
महात्मा गांधीचे १० वर्ष वास्तव्य राहिलेले सेवाग्राम आश्रम जागतिक पर्यटन स्थळ आहे. देश विदेशातील पर्यटक, अभ्यासक येथे येतात. आश्रम परिसराच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन या परिसराला तब्बल ३२ कॅमेऱ्याचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे. महात्मा गांधी यांचा आश्रम जगात प्रसिद्ध आहे. येथूनच स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करण्यात आले. गांधीनी अकरा व्रतासह अठरा रचनात्मक कार्य देशाला दिली.

बापूंच्या आश्रमावर राहणार सीसीटीव्हीची नजर
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : महात्मा गांधीचे १० वर्ष वास्तव्य राहिलेले सेवाग्राम आश्रम जागतिक पर्यटन स्थळ आहे. देश विदेशातील पर्यटक, अभ्यासक येथे येतात. आश्रम परिसराच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन या परिसराला तब्बल ३२ कॅमेऱ्याचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे.
महात्मा गांधी यांचा आश्रम जगात प्रसिद्ध आहे. येथूनच स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करण्यात आले. गांधीनी अकरा व्रतासह अठरा रचनात्मक कार्य देशाला दिली. बापू कुटी आणि कार्यालय या ठिकाणी साहित्य ठेवण्यात आलेले आहे. ते काचेच्या शोकेसमध्ये कुलूप बंद आहेत. बा व बापूचे साहित्य व वस्तू मौल्यवान आहे. पण आश्रमात गार्ड वा बंदुकधारी अशी व्यवस्था करता येत नाही कारण या बाबी आश्रमच्या परंपरेत बसत नाही. बापूंच्या कार्य काळापासून जसे आहेत तसेच ते ठेवण्यासाठी आश्रम कटीबद्ध आहे. पण घटना सांगून होत नाही. चष्मा चोरी प्रकरण झाले आणि साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न गाजला. त्यावेळी नव्या आश्रमच्या कार्यकारणीने २०१३ मध्ये अध्यक्ष जयवंत मठकर व मंत्री प्रा.डॉ. श्रीराम जाधव यांनी या बाबत लक्ष घातले. सर्व व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून आश्रमात सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे. ही काळाची गरज लक्षात घेऊन यासाठी खा. रामदास तडस यांच्याकडे ही बाब मांडली. यावर लगेच त्यांनी होकार देत आश्रम कॅमेºयाच्या देखरेखीखाली आणण्याच्या कामासाठी सहकार्य करण्यास सहमती दर्शविली. आता तब्बल बत्तीस कॅमेरे आश्रमावर लक्ष ठेवून आहे. यात आश्रम परिसर, सर्व स्मारके,रसोडा, गोशाळा, प्रवेश द्वार,कार्यालय आदी ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याने सुरक्षा कवच मजबूत झाले आहे. आता आश्रमात येणाºया प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर नजर ठेवता येणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे आश्रमातील दुर्मिळ वस्तूची चोरी होणार नाही.
गोशाळा, आहार केंद्रही कॅमेºयाच्या रेंजमध्ये
सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान अंतर्गत यात्री निवास आणि आहार केंद्रात नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. यामुळे सर्व क्षेत्रावर लक्ष ठेवण्यास सुकर झाले आहे. आज तब्बल बत्तीस कॅमेरे आश्रम व परिसरावर लक्ष ठेवून आहे.यात आश्रम परिसर, सर्व स्मारके, रसोडा, गोशाळा, प्रवेश द्वार, कार्यालय आदी ठिकाणी कॅमेरे लक्ष ठेवून आहे. त्यामुळे आश्रमाचे सुरक्षाकवच तगडे झाले आहे.