शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
3
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
4
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
5
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
6
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
7
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
8
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
9
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
10
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
11
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
12
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
13
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
14
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
15
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
16
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
17
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
18
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
19
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
20
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या निषेधार्थ कापसाची होळी

By admin | Updated: December 6, 2014 22:52 IST

नवीन केंद्र शासनानेही कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघातच केला़ जुनेच धोरण राबवून अल्प हमीभाव जाहीर केला़ राष्ट्रीय किसान जागृती अभियानने केंद्र सरकारच्या या कापूस धोरणाचा गावोगावी कापूस

वर्धा : नवीन केंद्र शासनानेही कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघातच केला़ जुनेच धोरण राबवून अल्प हमीभाव जाहीर केला़ राष्ट्रीय किसान जागृती अभियानने केंद्र सरकारच्या या कापूस धोरणाचा गावोगावी कापूस जाळून निषेध केला़ या आंदोलनात शेतकऱ्यांनीही सहभाग घेत शासनाचा निषेध नोंदविला़ वर्धेत मगनवाडी येथील खरेदी भवनासमोर कापसाची होळी करण्यात आली़ यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले़
मागील सरकारच्या काळात देशातील व प्रामुख्याने विदर्भातील कापूस उत्पादकांचे हाल झाले होते़ परिणामी, देशात व प्रामुख्याने विदर्भात कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या़ या शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा समोर करून सत्तेत आलेल्या नवीन सरकारनेही आता जुन्याच सरकारच्या धोरणाचा अवलंब केल्याने पुन्हा एकदा देशातील कापूस उत्पादक संकटात सापडला आहे़ यंदा पाऊस उशिरा आल्याने पेरणीसही विलंब झाला़ यामुळे शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन घटले़ अशा स्थितीत कापसाला असलेल्या अल्प भावामुळे एकरी खर्चही भरून निघणे कठिण झाले आहे़ नवीन शासनानेही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसल्याची जाणीव सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाली आहे़ नवीन शासन जुन्याच सरकारच्या वाटेवर असल्याने शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी कापूस धोरणाचा विरोध करण्यासाठी कापसाची गावोगावी होळी केली़
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र शासनाला जाळलेला कापूस भेट देण्यात येणार आहे़ शिवाय दिल्लीला जाऊन केंद्रीय कृषी मंत्र्यांनाही जाळलेला कापूस देणार असल्याची माहिती अभियानाचे प्रवक्ते अभिमन्यू भारतीय यांनी दिली़ निवेदन सादर करताना रवी मानव, सुमंत दास, यशवंत ढगे, डॉ़ राम बोकडे, जगदीश मर्दराज, बाबूलाल कोरी आदी शेतकरी उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)