शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

शहरात पशुगणना ढेपाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:03 IST

सुरुवातीपासूनच या अन् त्या कारणाने चर्चेत राहिलेली २० वी पशुगणना आता शहरीभागात ढेपाळल्याचे दिसून येत आहे. पशुसंवर्धन विभागाला पाहिजे तसे सहकार्य शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मिळत नसल्याने तब्बल ३८ हजार १५० च्यावर गृहभेटी शिल्लक आहेत.

ठळक मुद्दे३८,१५० गृहभेटी शिल्लक : स्थानिक स्वराज्य संस्थांचा असहकार

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुरुवातीपासूनच या अन् त्या कारणाने चर्चेत राहिलेली २० वी पशुगणना आता शहरीभागात ढेपाळल्याचे दिसून येत आहे. पशुसंवर्धन विभागाला पाहिजे तसे सहकार्य शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मिळत नसल्याने तब्बल ३८ हजार १५० च्यावर गृहभेटी शिल्लक आहेत. परिणामी ही पशुगणना पुन्हा एकदा नागरिकांसह पशुपालकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. सदर प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.प्रत्येक पाच वर्षांनी पशुगणना होणे गरजेचे आहे. परंतु, विविध कारणांमुळे काम पूर्ण न झाल्याने मुदतवाढ देण्यात आली. मुदत वाढ मिळाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने पुन्हा नव्या जोमानेच काम हाती घेऊन त्यावर कृती केली. परिणामी, मे महिन्यांत पशुगणनेच्या कामात वर्धा जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी राहिला.तर सध्या वर्धा जिल्हा राज्यात तिसºया स्थानी असल्याचे सांगण्यात येते. परंतु, वर्धा जिल्ह्यातील पशुगणनेचे १०० टक्के काम पूर्ण होण्यासाठी शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे न मिळणारे सहकार्य कारणीभूत ठरत आहे.विशेष म्हणजे यंदाच्या या पशुगणनेदरम्यान प्रगणकांकडून टॅबच्या सहाय्याने पशुची माहिती गोळा केली जात आहे. प्रगणकांना अडचणी येत असल्याने सदर टॅबमधील २.० वर्जन बदलवून ३.० हे वर्जन टॅबमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, सध्या शहरी भागात पशुगणनेचे काम रेंगाळल्याचे दिसून येत आहे.राज्यात वर्धा तिसऱ्या स्थानीमार्च महिन्यात २० व्या पशुगणनेच्या कामात वर्धा जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी होता. तर त्यानंतर युद्धपातळीवर काम झाल्याने वर्धा जिल्ह्याने भरारी घेत तिसऱ्या स्थान पटकाविले आहे. वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात १०४.४९ टक्के काम झाले असून ग्रामीण भागात यशस्वी काम करण्यात राज्यात वर्धा जिल्हा हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु, वर्धा जिल्ह्यातील शहरी भागात पाहिजे तसे काम न झाल्याने शहरी गटात वर्धा आठव्या स्थानी आहे. मात्र, शहरी व ग्रामीण याचा एकत्र विचार केल्यास वर्धा जिल्हा सध्या राज्यात तिसºया स्थानी असल्याचे सांगण्यात आले.‘आतातरी... कसेतरी’चा फार्मूला?पशुगणना पूर्ण करण्यासाठी टॅब उपलब्ध करून देत ३१ डिसेंबर हा कालावधी निश्चित करण्यात आला होता. परंतु, या कालावधीत पशुगणनेचे काम पूर्ण न झाल्याने पशुगणना पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. मात्र, सदर वाढीव मुदतीतही काम पूर्ण न झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा पशुगणना पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. परिणामी, पशुगणना पूर्ण करण्यासाठी जबाबदार बड्या अधिकाऱ्यांकडून ‘आतातरी...कसेतरी’चा फार्मूला तर राबविल्या जात नाही ना, असा प्रश्न सुजान नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.२,८३,२३३ गृहभेटी पूर्णएप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील आकडेवारीनुसार वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात २ लाख २२ हजार ३० तर शहरी भागातील ६१ हजार २०३ गृहभेटी प्रगणकांनी करून पशुंची माहिती टॅबद्वारे भरली आहे. वर्धा जिल्ह्यात ग्रामीण भागातील पशुगणना पूर्ण करण्यात आली असून २०११ च्या जनगणनेनुसार शहरी भागातील तब्बल ३८ हजार १५० गृहभेटी शिल्लक आहेत.वर्धा जिल्ह्यात ३ लाख ९ हजार ८४६ घरे२०११ च्या जनगणनेनुसार वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात २ लाख १२ हजार ४९३ तर शहरी भागात ९७ हजार ३५३ घरे असल्याची नोंद घेण्यात आली आहे. याच जनगणनेचा आधार घेत सध्या २० वी पशुगणना पूर्ण केली जात आहे.