शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी महिला मंडळे झालीत निष्क्रिय

By admin | Updated: July 21, 2014 23:59 IST

स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत अनेक गावांत दारूबंदी महिला मंडळांची स्थापना करण्यात आली होती़ गावातील दारूच्या भट्ट्या व दुकाने या महिलांनी बंद करून अवैध दारूविक्रेते व उत्पादकांच्या

पोलिसांचे अहसकार्य : दारूविक्रीला उधाणसेलू : स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत अनेक गावांत दारूबंदी महिला मंडळांची स्थापना करण्यात आली होती़ गावातील दारूच्या भट्ट्या व दुकाने या महिलांनी बंद करून अवैध दारूविक्रेते व उत्पादकांच्या मुसक्या बांधल्या होत्या़ पोलीस यंत्रणा आपल्या पाठीशी आहे, हा विश्वास या महिलांना असल्याने त्यांनी बेधडक हे कार्य केले; पण विश्वास ठेवलेले पोलीसच विश्वासघातकी निघाल्याची जाणीव झाल्यावर या मंडळांना अखेरची घरघर लागली़ आता एक-दोन गावे वगळता अन्यत्र दारूबंदी महिला मंडळेच दिसत नाहीत़ सेलू पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अनेक गावांत महिलांनी पुढाकार घेत दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्याचे काम केले़ मद्यपिंची धिंड काढली़ स्वत:चा पती दारूडा असेल तर त्याला रात्रभर घराबाहेर अन्न-पाण्याविना ठेवण्याचे धाडस केले़ या धडाडीमुळे दारू उत्पादक व विक्रेते वठणीवर आले़ अनेकांना पोलीस ठाण्यात भाकरी मोडाव्या लागल्या; पण पोलिसांना हे नको होते़ त्यांच्या वरकमाईचा प्रश्नच या अवैध धंद्यावर होता़ महिला मंडळांविरूद्ध पोलिसांनीच सुरूंग पेरले़ दारूविक्रेत्यांचे मनोबल वाढवून महिला मंडळातील कार्यकर्त्यांची बेअब्रू करण्याचा सल्ला दिला़ ज्या महिलांनी पोलिसांवर विश्वास ठेवला, त्यांनीच झुप्या मार्गाने घात केला़ यानंतर महिलांच्या अंगावर अवैध व्यावसायिक चालून जाऊ लागले़ पोलिसांत प्रकरण गेल्यावर उलट महिला मंडळांनाच दमदाटी केली जात होती़ असे अनेक प्रकार यापूर्वी घडले़ रणचंडीकेचा अवतार धारण करणाऱ्या महिलांची शक्ती क्षीण करण्याचे पालक पोलिसांनीच केले़ यामुळे महिला मंडळे आपोआपच गारद झाली आणि पोलिसांचे फावले़महिला मंडळांच्या क्षीण शक्तीकडे कुणी पाहिले नाही़ आता याच मंडळांना विश्वासात घेत दारूमुक्तीच्या लढ्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक झाले आहे़ पोलिसांनी यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे़ महात्मा गांधी यांच्या नावाला कलंकित करणाऱ्या दारूबंदीचा फज्जाच झाला आहे़ याचे कुणालाच वाईट वाटत नाही़ पोलिसांनी मनावर घेतले तर दारूचा व्यवसाय करण्याची कुणीच हिंमत करणार नाही; पण तसे होत नाही़ सेलू व परिसरात खुलेआम नसली तरी लपून-छपून दारू विकली जाते़ पोलिसांना सर्व ठिय्ये माहिती आहे़ एकेका दारूविक्रेत्याच्या घरी प्रत्येक महिन्यात किमान पाच पोलीस जातात व प्रत्येक जण एक हजार रुपये घेऊन येतात, ही सत्यता आहे़ एकट्या सेलू शहरातही ठाणेदारांनी पोलिसांना विचारणा केली तर दारूविक्रेत्यांकडून लाच घेणारे अनेक जण आढळतील़ पोलीस दादागिरी करीत असतील तर ठाणेदाराबद्दलही लोक संशय व्यक्त करतात़ ठाणेदार उल्हास भुसारी यांच्याकडून अपेक्षा असल्यामुळे त्यांनी दारूबंदी महिला मंडळे पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)