काँग्रेस आमदार रणजित कांबळेंवर अखेर गुन्हा दाखल; अधिकाऱ्याला धमकावणं महागात पडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 11:15 PM2021-05-10T23:15:27+5:302021-05-10T23:18:01+5:30

वैद्यकीय सेवा व्यक्ती व संस्था विरोधात हिंसक कृत्ये अंतर्गत गुन्ह्याची नोंद

case registered against Congress MLA Ranjit Kamble for threatening health officer | काँग्रेस आमदार रणजित कांबळेंवर अखेर गुन्हा दाखल; अधिकाऱ्याला धमकावणं महागात पडलं

काँग्रेस आमदार रणजित कांबळेंवर अखेर गुन्हा दाखल; अधिकाऱ्याला धमकावणं महागात पडलं

Next

वर्धा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना फोन वरून धमकी दिल्या प्रकरणी काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांच्यावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय सेवा व्यक्ती व संस्था विरोधात हिंसक कृत्ये अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ठाणेदार सत्यजित बंडेवार यांनी सांगितले आहे.

 माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शिवीगाळ केल्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, याप्रकरणी  राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना (वर्ग १) यांच्यावतीने थेट जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली आहे.

Web Title: case registered against Congress MLA Ranjit Kamble for threatening health officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app