शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

कार प्रकल्पग्रस्तांची जिल्हाकचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:38 AM

कारंजा तालुक्यातील कारप्रकल्पासाठी सुसुंद्रा व माणिकवाडा येथील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत केली.

दालनासमोर ठिय्या : सकारात्मक चर्चेअंती आंदोलन मागे लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कारंजा तालुक्यातील कारप्रकल्पासाठी सुसुंद्रा व माणिकवाडा येथील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत केली. याला १८ वर्षांचा कालावधी लोटूनही मोबदला देण्यात आला नाही. मंगळवारी मरणशय्येवर असलेल्या वृद्धाला घेवून प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. मोबदल्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या दिला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेअंती आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे बाळा जगताप यांनी केले. कार प्रकल्पाच्या कालव्याकरिता सुसुंद्रा व माणिकवाडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या; मात्र, गुलाब लाहेबर, गणपत उईके, मैनाबाई उईके व रामा आत्राम यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. वेळोवेळी संबंधीतांना निवेदने देऊनही काहीच उपयोग झाला नाही. या शेतकऱ्यांची कागदोपत्री अधिग्रहीत जमिनीची नोंद नव्हती. या नोंदीकरिता प्रहार संघटनेच्यावतीने दफन आंदोलन केल्यानंतर त्यांची नोंद घेण्यात आली. माणिकवाडा व सुसंद्रा येथील शेतकऱ्यांना मोबदल्याची अल्पशी रक्कम मिळाली. रक्कम देताना अनेक प्रकरणात नको तेवढ्या चूका प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केल्या. यात शेतकऱ्यांना नाहक त्रासाचा सामना करावा आगल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. जमिनी गेलेल्या चार वयोवृद्ध प्रकल्पग्रस्तांना मोबदला न मिळाल्याने त्यांना वैद्यकीय उपचार घेणेही कठीण झाले आहे. पोटासाठी या वयातही त्यांना झटावे लागत आहे. यामुळे त्यांचा थकीत मोबदला तात्काळ द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती. मोबदल्याच्या मागणीसाठी आलेल्या वयोवृद्धांची दैना पाहून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वत: दालनाबाहेर येत आंदोलकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी निम्मी रक्कमही दिली. शासनाच्या यादीत सदर प्रकल्पग्रस्तांचे नाव आहे की नाही याची चौकशी करून तात्काळ योग्य कार्यवाही करण्याचे आदेशही सहायक पुर्नवसन अधिकारी दांडेकर यांनी दिल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.