वर्धा जिल्ह्यात कार व दुचाकीचा अपघात; एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 16:55 IST2018-11-13T16:55:02+5:302018-11-13T16:55:24+5:30
तळेगाव पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या आष्टी रोडवरील नाल्याजवळ वळणावर चारचाकी व दुचाकीचा अपघात होऊन त्यात एकजण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली.

वर्धा जिल्ह्यात कार व दुचाकीचा अपघात; एक जखमी
ठळक मुद्देकारचा टायर फुटल्याने बसली दुचाकीला धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: तळेगाव पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या आष्टी रोडवरील नाल्याजवळ वळणावर चारचाकी व दुचाकीचा अपघात होऊन त्यात एकजण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. करजगाव येथील रहिवासी सूरज कांडलकर (२७) व राहूल कांडलकर (३२) हे दोघे दुचाकीवरून वर्धमनेरीला जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारचा टायर फुटल्याने तिची धडक दुचाकीला बसली. यात दुचाकीची मोडतोड झाली असून कारचालक कार्तिक कनोजे (३९) याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या अपघातात एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.